ताज्या घडामोडीमुंबई

राज्यात वाइनचे सेवन फक्त चार टक्के

मुंबई | सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअरमधून वाइनविक्रीची परवानगी दिल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच या वाइनचे राज्यात सेवनाचे प्रमाण इतर मद्यांच्या तुलनेत फक्त चार टक्के असल्याची बाब आकडेवरीवरून उघडकीस आली आहे.बीअर शॉपीतून वाइन विक्रीची परवानगी आहे. वाइन विक्री सुपर मार्केटमधून करून दिल्यास मद्याचा महापूर येईल, असा विरोधकांचा दावा असला तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्याचा इन्कार करताना वाइन विक्रीचे राज्यातील आकडे पुढे केले जात आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वाइन विक्रीच्या नव्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे सरकार या निर्णयाचा फेरविचार करते किंवा नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. परंतु राज्यात इतर मद्यांचा विचार करता वाइन विक्री तुरळक असल्याचे दिसून येते. मध्यंतरी आयात करणाऱ्यात येणाऱ्या परदेशी मद्यावरील अबकारी करात ५० टक्के कपात केल्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी आता वाइन विक्रीचा मुद्दाही लावून धरला आहे.

राज्यात देशी मद्याचे वर्षांकाठी २१ ते २४ कोटी लिटर्स इतके सेवन होते. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य व बीअरचे हे साधारणत: वर्षांकाठी १३ ते १६ कोटी लिटर्स इतके सेवन होते. त्या तुलनेत वाइन एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये ४४ लाख लिटर्स, तर एप्रिल ते डिसेंबर २०२१ मध्ये ५८ लाख लिटर्स इतकी विकली गेली आहे. आयात करण्यात आलेल्या विदेशी मद्याचे प्रमाण पॉइंट पाच टक्के म्हणजे वर्षांकाठी सहा ते आठ लाख लिटर्स इतकेच आहे. गेल्या ४० वर्षांपासून राज्यात नव्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने बंद आहेत. मध्यंतरी नवे मद्यविक्री धोरण आणण्याचा प्रस्ताव सादर करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला सांगण्यात आले होते. त्यावेळी विमानतळ, मेट्रो स्थानके, शॉपिंग मॉल्स परिसरात मद्यविक्रीचे परवाने देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र त्यावर निर्णय झालेला नाही.

नवे धोरण काय?

पाश्चिमात्य देशांप्रमाणेच स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून वाइन विक्रीला परवानगी देण्यात येणार आहे. ज्या वाइनरी वाइन तयार करतात त्यांना थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये स्वयंसेवेने खरेदी करण्याची सुविधा असलेले शेल्फ-इन- शॉप या पद्धतीने विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. कुलूपबंद करता येईल अशा कपाटातून सीलबंद बाटलीमध्ये वाइनची विक्री करता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button