breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आज वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण, भारतातून दिसणार का?

 

मुंबई – वर्ष २०२१ सालचं पहिल चंद्रग्रहण आज दिसणार असून दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी चंद्रग्रहणाला प्रारंभ होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी ही ग्रहण समाप्त होणार आहे. . हा दिवस वैशाख महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस आहे, याला बुद्ध पूर्णिमा देखील म्हणतात. हे चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात असेल.

आजचं चंद्रग्रहण पूर्व भारतातून दिसणार असून . कोलकातामध्ये राहणारे लोक या दृश्याचा आनंद घेऊ शकतील. हे ग्रहण तिथे दुपारी 3:15 च्या सुमारास सुरु होईल आणि संध्याकाळी 6:22 वाजता समाप्त होईल. रिपोर्टनुसार, सुपर मून केवळ 14 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत असेल.

ग्रहणावेळी चंद्र बहुतेक भागांत पूर्व क्षितिजाच्या खाली असेल म्हणून भारतात ते दिसणार नाही. पण, हे ग्रहण काही मिनिटांसाठी बंगाल आणि पूर्व ओदिशामध्ये दिसेल, ज्यात भारताच्या पूर्व राज्यांच्या अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांचा समावेश असेल.

हे चंद्रग्रहण अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंद महासागराच्या काही भागात पूर्णपणे दिसून येईल. हे ग्रहण जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, सिंगापूर, बर्मा, फिलिपिन्स आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसून येईल.

वर्ष 2021 मध्ये किती ग्रहण :

या वर्षी चार ग्रहण लागणार आहेत, दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. वर्षाचे पहिले ग्रहण म्हणून, प्रथम चंद्रग्रहण 26 मे रोजी लागणार आहे. तर दुसरे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी लागेल. तर 10 जूनला पहिले सूर्यग्रहण आणि 4 डिसेंबर रोजी दुसरे सूर्यग्रहण लागेल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button