breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नवाब मलिक, अनिल देशमुख राज्यसभेच्या मतदानाला येणार का? अजित पवार म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी भाजपनं (BJP) पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक असे ३ उमेदवार दिले आहेत. शिवसेनेनं (Shivsena ) संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) प्रफुल पटेल आणि काँग्रेसनं (Congress) इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. सहा जागांवर ७ उमेदवार असल्यानं निवडणुकीतील चुरस वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीत एका मताला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) सध्या तुरुंगात आहेत. ते राज्यसभा निवडणुकीत मतदान कसं करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आम्ही मतदानासाठी न्यायालयात अर्ज करत आहोत, असं सांगितलं.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसनं मतदानाच्या दृष्टीनं तयारीला लागलेली आहे. आम्ही वकिलांच्या मार्फत न्यायालयात जाऊन नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्यास परवानगी द्यावी,अशी विनंती करणार आहोत, असं अजित पवार म्हणाले. मागच्या काळात छगन भुजबळ आणि रमेश भुजबळ देखील मतदानाला आले होते. विधिमंडळात ते मतदानाला आले होते. त्यानुसार आम्ही कसोशीनं कामाला लागलेलो आहे, असं अजित पवार म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीतील विजयासाठी किती मतं आवश्यक?
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची ४२ मतं आवश्यक आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेनेचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आवश्यक असलेलं ४२ चं संख्याबळ पूर्ण होण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपची मदार अपक्ष आमदारांवर आहे. या निवडणुकीत एका मताला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावं, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button