Uncategorizedताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गुवाहटीला का नेण्यात आलं… शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना ; भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची स्ट्रॅटर्जी?

आसामः शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी मंगळवारी नवी चाल खेळत शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ३० ते ४० आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसोबत सूरतची वाट धरली होती. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्या मनधरणीचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात अद्याप पक्षाला यश आलं नाहीये. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह आसाममधी गुवाहटी गाठलं आहे. आमदारांना गुवाहटीमध्ये का ठेवण्यात आलं आहे. याचा घेतलेला आढावा.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास शिंदे आणि त्यांच्या गटाने गुजरात सोडलं. त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करुन आसाम येथील गुवाहटीमध्ये नेण्यात आलं. आज सकाळच्या सुमारास शिंदे गुवाहटीला पोहोचले. यावेळी भाजप आमदार सुशांता बोर्गोहेन तिथे उपस्थित होते. गुवाहटी विमानतळावरुन शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये घेऊन जाण्यासाठी बसेस बोलवण्यात आल्या होत्या. हॉटेल रॅडिसनवर बंडखोर आमदारांना ठेवण्यात आलं आहे. यावेळी विमानतळ व हॉटेल परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी गुवाहटीचे पोलीस आयुक्त हरमीत सिंह व भाजपचे खासदार पल्लव लोचन आणि पाणीपुरवठा मंत्री उपस्थित होते. आमदारांना गुवाहटी येथे ठेवण्यामागे भाजपचा हात असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांना सरकारमधून बाहेर काढण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटसची रणनितीची अंमलबजावणी केली आहे. ‘ऑपरेशन लोटस’ तडीला नेण्यात यश मिळविल्याची चर्चा आता सुरू आहे. या आमदारांना गुवाहटीला नेण्यामागे भाजपचा हेतू असल्याचं बोललं जात आहे. आसाममधील स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गुवाहटी व आसाममध्ये शिवसेनेची ताकद नाहीये. तसंच, भाजपशासित राज्य असल्याने आमदार सुरक्षित असतील. पक्षाकडून त्यांना संपर्क साधता येणार नाही. आमदारांना गुवाहटीत नेण्यामागे हे एक प्रमुख कारण असल्याचं बोललं जातंय.

तसंच, मुंबई ते गुवाहटी हे अंतर भौगोलिकदृष्ट्या जास्त आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय जरी घेतला तरी शिवसेना नेत्यांना त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी गुवाहटीत येण्यासाठी वेळ लागेल, असंही बोललं जातं आहे. म्हणून भाजपने गुवाहटी निवडल्याची चर्चा आहे. सत्तास्थापनेबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास गुवाहटी ते दिल्ली हे अंतर कमी आहे. त्या दृष्टीनेही भाजप नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button