ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हनुमान चालिसा म्हटल्यावर काही लोकांना राग का येतो; फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले

कोल्हापूर | ‘भाजपचा श्वास हिंदुत्व आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खूप कमी वेळ आमच्याकडे आले होते, त्यामुळे त्यांना भाजप अधिक समजला नाही. त्यांना भगव्याचा तिटकारा आहे. शाहू फुले यांच्या विचाराला तिलांजली देण्याचं काम महविकास आघाडी सरकार करत आहे. विशिष्ठ समाजाच्या लांगुनचालनाला आमचा विरोध आहे. भोंगा वाजवल्यावर राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्यावर राग कशाला येतो?’ असा सवाल करत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस कोल्हापुरात आले आहेत. शनिवारी जाहीर सभा झाल्यानंतर रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्ता पक्षाचे नेते, मंत्री मोठ्या प्रमाणात दहशत पसरवत आहेत. या दहशतीला झुगारून मतदार भाजपला मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

‘उत्तर कोल्हापूर हा हिंदु्ववादी मतदार संघ आहे. आमच्या विचारला मानणारा हा मतदार संघ आहे. राजकारणात गणित चालत नाही तर केमिस्ट्री चालते आणि या मतदारसंघातील मतदारांची केमिस्ट्री आमच्यासोबत आहे. त्यामुळे पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत पांडुरंग पावला आता कोल्हापुरात आई अंबाबाई निश्चितच आम्हाल आशीर्वाद देईल,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, राज्य शासनाच्या वतीने खूप अनागोंदी सुरू आहे. मागील महापुरात भाजप सरकारने दिलेली मदत आणि आताच्या महापुरात महाविकास आघाडी सरकारने दिलेली मदत याची कल्पना कोल्हापूरवासियांना आहे. कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे योगदान काय? असा सवाल फडणवीस यांनी विचारला. ते म्हणाले, महविकास आघाडीच्या कारभारामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, स्वतःच्या पलिकडे ते काहीच पहात नाहीत. त्यामुळे कंटाळलेली जनता आता पोटनिवडणुकीत भाजपलाच विजयी करेल आणि यातून भाजप विधिमंडळात १०७ वा भाजपचा आमदार सत्यजित कदम असतील.

दरम्यान, शिवसेनेवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने उर्दू कॅलेंडर काढून त्यावर हिंदूहृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे छापले याचा अर्थ समजून घ्या. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरी विजेता कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील यास भाजपच्या वतीने पाच लाख रुपये देण्याची व कोल्हापुरात जंगी सत्कार करण्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, केशव उपाध्ये, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button