breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘कोण देताय १०० कोटी?, मीही गृहमंत्री होतो’; छगन भुजबळांकडून अनिल देशमुख यांची पाठराखण

सोलापूर |

‘गृहमंत्र्याला कोण देतंय १०० कोटी?, मीही गृहमंत्री होतो’, अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची पाठराखण केली आहे. अनिल देशमुख आणि दुसरी व्यक्ती म्हणे असे बोलले हे तिसरा चौथ्याला सांगतोय, असे सांगत अनिल देशमुख कोणाला बोलले? सचिन वाझेने (Sachin Vaze) सुद्धा असेच सांगितलं की ते बोलले हे मी ऐकलं. मला तर ते काही बोलले नाहीत, असे सांगत देशमुखांवरील आरोप खोटा असल्याचे सूचित केले.

सोलापूर दौऱ्यावर गेलेले छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. ज्या वाझेला अटक झाली आहे तो चांदीवाल आगोयासमोर सांगतो की अनिल देशमुख मला बोलले नाहीत. मी तसं लांबून ऐकलं. याला काय अर्थ आहे हो? याचा अर्थ काही करून त्यांच्यावर काहीतरी आरोप ठेवायचे आणि असे मोठे १०० कोटी, ५०० कोटी, १००० कोटी असे आरोप ठेवले की मग ईडीची केस मजबूत करायची आणि जास्तीतजास्त तुरुंगात ठेवायचं हा प्रकार आहे ईडीचा, असे सांगत भुजबळ यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

ईडीवर टीकास्त्र सोडताना भुजबळ पुढे म्हणाले की, कोर्टाला असं सांगितल्यानंतर कोर्टाचाही नाईलाज आहे. कोणी वसूल केले पैसे? कुठे गेले पैसे?, मिळाले का तुम्हाला? पण फक्त सांगायचं की हा असं बोलला असं आम्ही ऐकायचं आणि यावर खटला उभा राहतो, असे आपण गेल्या ५० वर्षांत कधी पाहिले नाही असे सांगत भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना जरी आघाडी मधून बाहेर पडली असली तरी याचा कोणताही परिणाम कोल्हापूर निवडणुकीवर होणार नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. कोल्हापुरात महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मजबुतीने काम करीत असून शिवसेनेतील किल्मिषेही आता दूर झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button