breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोण कुठं फिरतंय, गार्डनमध्ये गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार, अजितदादांची टोलेबाजी

पुणे : “रात्री कोण कुणासोबत कुठं फिरतंय, कसं फिरतंय, गार्डनमध्ये कोण गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये CCTV कॅमेरांचं जाळ उभारलं आहे. CCTV च्या माध्यमातून कुठल्या बहादराचं काय चाललंय, हे आता मला कळेल”, अशी मिश्किल टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन पार पडलं. ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्रा’चं उद्घाटन तसंच उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचं उद्घाटन दादांच्या हस्ते पार पडले. अजित पवार पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असले की जरा जास्त खुलतात. याचाच प्रत्यय आज पुन्हा पिंपरी चिंचवडकरांना आला. शहरातील पक्षाच्या पदवाटप आणि कार्यकर्ते मेळाव्यात बोलताना शहरात वाढवलेल्या CCTV च्या जाळ्याविषयी दादांनी मिश्किल टोलेबाजी केली.

“पिंपरी चिंचवड शहरामध्ये गृह खात्याच्या वतीने ८८ चौकांमध्ये २८७ कॅमेरे आणि मनपाच्या वतीने २२०० कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे शहरात ७ हजार ६०० कॅमेरे बसणार आहेत. तुम्ही रात्री कुठे जाता, दिवसा कुठे जाता, कुणाबरोबर फिरता, काय करता गार्डनमध्ये कुठं आणि कुणासोबत गुलूगुलू करता, सगळं कळणार आहे…”, अशा कोपरखळ्या अजित पवार यांनी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना मारल्या. “जो गुंडगिरी करत असेल, जो दशहत करत असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असेल, त्याचा आम्ही विचार करणार नाही. त्याच्यावर जर चार-पाच केसेस दाखल झाल्या तर त्याला आम्ही तडीपार करु. तडीपार करुनही शहाणा जागेवर आला नाही तर थेट मोक्का लावू… त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आम्हाला कारण नसताना कुणाला त्रास द्यायचा नाही. आमच्या पोलिस यंत्रणेला इतरही बाकी भरपूर कामं आहेत. पण काहींच्या स्वभावात बदलच होत नसेल तर आम्ही त्यावर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असंही अजित पवार यांनी नि:क्षून सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button