breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नितेश राणेंच्या अटकेसंबंधी विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “गुन्हा केला तर…”

मुंबई |

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. सचिन सातपुतेच्या चौकशी नंतर शिवसेनेनं नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणेंना अटक करण्यासंबंधी होणाऱ्या मागणीवर बोलताना ते म्हणाले की, “मला याविषटी माहिती नाही, ही कायदेशीर बाब आहे. मी बोलणं बरोबर नाही. तेथील दोन पालकमंत्री आहेत ते बोलतील. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कोणी काही गुन्हा केला तर कायद्याने कारवाई होते. पण माझ्याकडे जास्त माहिती नसल्याने त्याविषयी बोलणं योग्य नाही”.

  • नाराणय राणेंची प्रतिक्रिया…

नितेश राणेंनी काहीही केलेले नसून केवळ सुडाच्या भावनेतून हे आरोप करण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. “नितेश राणेंनी काय केलं आहे? काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारुढ लोकांचा पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरु आहे. गुन्हा दाखल केला आहे की नाही हे मला माहित नाही. पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेले आहे. नितेश राणे अज्ञातवासात नाहीत. अज्ञातवासात जाण्याची आम्हाला गरज नाही. ते आमदार आहेत. आम्ही अटक करणार अशा रितीने बातम्या दिल्या तर कोर्टात जावं लागेल,” असे नारायण राणे म्हणाले. कोणावरही हल्ला करण्यात नितेश राणेंचे काही योगदान नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले.

  • राज्यातील भाजपा नेत्यांवर हल्लाबोल

“महाराष्ट्राच्या बाबतीच काही चांगलं, सकारात्मक, शाबासकी देणारं घडलं तर राज्यातील विरोधी पक्ष नाराज होतो. हा एक आजार असतो त्यावर कसे उपचार करायचे ते आम्ही पाहू,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

  • “राज्यपालांनी इतका अभ्यास करणं बरं नाही”

विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन राज्यपालांवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, “राज्यपाल आपले फार अभ्यासू असून इतका अभ्यास बरा नाही. हे अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. एकतर मुळात लॉकडाउनमध्ये अभ्यास कमी झाला आहे, त्यात तुम्ही असा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करु लागलात. घटनेत काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या असून त्यानुसार तुम्हााल काम करायचं आहे. घटनेत मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशी मान्य कराव्यात असं लिहिलं असून हे बंधनकारक आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीचं अद्याप काही झालेलं नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button