ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात चाललंय तरी काय! 17 वर्षीय मुलाचा 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे | पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला हॉटेलवर घेऊन जात तिच्यासोबत वारंवार बलात्कार केला. या मुलीने नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार मे ते ऑक्टोबर या कालावधीत घडला.याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी यांना पंधरा वर्षांची मुलगी आहे. सतरा वर्षाच्या मुलाने तिला मे महिन्यात लोहगाव येथील हॉटेलमध्ये नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या सर्व प्रकाराला विरोध केला असता शिवीगाळ करून तिला ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button