breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय घडलं? संभाजीराजेंनी सांगितली Inside Story

मुंबईः छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीत काय घडलं? याचा खुलासाही त्यांनी केला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळं छत्रपती संभाजीराजे शिवसेनेकडून राज्यसभेवर जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शिवसेनेने संजय पवार यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर संभाजीराजे काय निर्णय घेणार व मुख्यमंत्री- संभाजीराजे यांच्यातील भेटीत काय घडलं याची चर्चा होती. याबाबत आज संभाजीराजे यांनी खुलासा केला आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडला असंही संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी दोन खासदार माझ्याकडे पाठवले होते. तेव्हा आमची मिटिंगही झाली होती. तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा आम्ही उद्याच उमेदवारी जाहीर करतो. मात्र, मी अपक्ष म्हणून लढणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही, हे मी त्यांना स्पष्ट केलं. त्यानंतर दोन दिवसांनी मला मुख्यमंत्र्यांनी फोन करुन वर्षावर येण्याचे आमंत्रण दिलं. आपण सविस्तर बैठक घेऊन चर्चा करु असं ते मला म्हणाले त्यामुळं मीसुद्धा मीसुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आम्ही तीन मुद्द्यांवर बोललो. ते म्हणाले आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचे नाही असं म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला दिला. मात्र, तेव्हाही मी त्यांना नम्रपणे नकार दिला. त्याउलट मी त्यांना दोन प्रस्ताव दिले. शिवसेनेची ही जागा असं ते म्हणतात. त्यामुळं मी त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा, असा प्रस्ताव मी त्यांना दिला. पण राजे ते शक्य होणार नाही, असं म्हणून त्यांनी त्यास नकार दिला.

मुख्यमंत्र्यांनी आणखी एक प्रस्ताव दिला. तो म्हणजे, महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनापुरस्कृत उमेदवार करायला आम्ही तयार आहोत. मात्र, तो प्रस्ताव मी मान्य केला नाही. त्यावर मी त्यांना दोन दिवसांचा कालावधी विचार करण्यासाठी दिला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या मंत्र्यांचा मला फोन आला. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला सांगितली आहे. तुम्हाला अपक्ष पुरस्कृत उमेदवारी द्यायचीये. त्यावर आमची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी आणि मी दिलेल्या सूचना मिळून ड्राफ्ट तयार झाला, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला भेटायला आहे. त्यात मंत्री होते, त्यांच्या जवळचे स्नेही होते, एक खासदार होते. त्यांच्या स्नेहींनी सागंतिलं की आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. पण मी नकार दिला. त्यानंतर त्यांनी सांगितलेला ड्राफ्ट मी वाचला. त्यात एक शब्द होता. तो शब्द बदलल्यानंतर ड्राफ्ट फायनल झाला, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर मी कोल्हापूरला रवाना झालो. पण कोल्हापुरला जात असताना नवीन बातम्या दिसल्या. तर कोल्हापुरला गेल्यावर समजलं संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मी खासदारांना फोन केला हा काय प्रकार आहे?. पण तेही काही बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना फोन केला त्यांनी उचलला नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला. याचे वाइट वाटतंय, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button