Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

चोरी करायला गेला आणि घडलं भलतचं काही…

ठाणे | महापालिकेच्या वतीने शहरी गरिबांसाठी बीएसयूपी योजने अंतर्गत डोंबिवली आणि खंबाळपाडा परिसरात इमारती उभारल्या आहेत. मात्र, अद्याप लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला नाहीये. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून या इमारतींना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. या इमारतीच्या दरवाजे, ग्रील चोर चोरून नेत आहेत.दरम्यान,कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची भोईरवाडी येथील वसाहतीत सोमवारी रात्री दोन चोरटे चोरी करायला गेले. यावेळी इमारतीच्या ड्रेनेज पाईपच्या सहाय्याने आठव्या मजल्यावरून खाली उतरत असताना यातील एक चोरटा मोहम्मद स्लिम भाटकर (वय २४) याचा पहिल्या मजल्यावरील स्लॅपवर पडून त्याचा मृत्यू झाला आहे. तर अरफाह हा जखमी झाला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा चोरटा अरफाह मुस्तफा पिणारी (वय २२) याला पोलिसांनी अटक केली आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या मोहम्मदला या चोरीच्या घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे.

डोंबिवली पूर्वेतील भोईरवाडी परिसरातील केडीएमसी वसाहतीतील घटना…

डोंबिवली पूर्वेतील भोईरवाडी परिसरातील केडीएमसी वसाहतीतील बिल्डिंग क्रमांक ४ मध्ये हि घटना घडली आहे. न्यू गोविंदवाडी परिसरात पालिकेच्या बीएसयुपी बिल्डिंगमध्ये मयत चोरटा मोहम्मद रहाण्यास आहे. तर अरफाह हा देखील न्यू गोविंदवाडी परिसरात वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास मोहम्मद आणि अरफाह हे भोईरवाडी येथी केईएमसीच्या रिकाम्या वसाहतीत इलेक्ट्रिक वायर चोरी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकाच्या ही बाब लक्षात आली. त्याने या दोघांना हटकले. तो त्यांना वर बघायला गेला असता दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. ड्रेनेज पाईप लाईनच्या सहाय्याने आठव्या मजल्यावरून खाली उतरत असताना मोहम्मद याचा पहिल्या मजल्यावरील स्लॅप वर पडून मृत्यू झाला. तर अरफाह हा जखमी झाला आहे.

डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली माहिती…

सुरक्षा रक्षकाने तत्काळ टिळकनगर पोलिसांना संपर्क साधत याची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देत आरोपी अरफाह याला अटक केली आहे. तर मोहम्मद याचा मृतदेह तपासणीसाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठविला. मोहम्मद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button