breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

म्हशीला शोधण्यासाठी गेल्या… आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळले, काय घडलं नेमकं?

अकोला |

धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून आईसह दोन अल्पवयीन मुलींचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील आहे. दगडपारवा धरणाच्या सांडव्या या मायलेकींचा बुडून मृत्यू झाला. सद्यस्थिती याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आई आणि दोन मुली असे तिघींचे बाहेर काढण्यात आले आहेत.

बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा (Ragad-Parava Dam) येथील धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहतं. या परिसरात घोगरे कुटुंबातील दोन मुली आणि त्यांची आई हे आपल्या म्हशीचा शोध घेण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजतापासून घरून निघाले. मात्र रात्री उशीर झाल्यानंतरही त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबातील प्रमुख असलेले सुरेश घोगरे यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र कुठलाही सुगावा त्यांच्या हाती लागला नाही. अखेर त्यांनी या संदर्भात बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

धरणाच्या सांडवाच्या पाण्यात आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांना मायलेकींचे मृतदेह आढळून आले. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले आणि बचाव पथकासह गावकऱ्यांच्या मदतीने मायलेकींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

आईसह दोन अल्पवयीन मुलींचा दुर्देवी मृत्यू

सरिता सुरेश घोगरे (वय ४०, राहणार दगडपारवा, ता. बार्शीटाकळी जि. अकोला) असं मृत महिलेचं (आई) नाव आहे. तर मोठ्या मुलीचं नाव अंजली सुरेश घोगरे (वय १६, राहणार दगडपारवा, ता. बार्शीटाकळी जि. अकोला) आणि दुसऱ्या लहान मुलीच नाव वैशाली सुरेश घोगरे (वय १४, राहणार दगडपारवा, ता. बार्शीटाकळी जि. अकोला) नाव आहे. सुरवातीला मोठी मुलगी अंजली ही पाण्यात बुडाली आणि तिला वाचवण्यासाठी गेलेली आई आणि लहान बहिणही पाण्यात बुडाली. यामुळे तिघींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे.

घोगरे कुटुंब दुःखात

आईसह दोन्ही मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. त्यामुळ घोगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर दगडपारवा भागात हळहळ व्यक्त होत आहे. आज त्यांच्यावर सायंकाळी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या मायलेकींचा खरचं अपघाती मृत्यू झाला की घातपात होता? याचा तपास सध्या बार्शीटाकळी पोलीस करताहेत. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अपघाती मृत्युची नोंद केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button