breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

“आम्ही फक्त काही तासांमध्ये…”; काबूल विमानतळावरील बॉम्बस्फोटानंतर ब्रिटनची प्रतिक्रिया

नवी दिल्ली |

काबूल विमानतळावर तीन आत्मघाती बॉम्बस्फोटांनंतर सर्व देशांनी सतर्क राहण्यास सुरवात केली आहे. ब्रिटनने अफगाणिस्तानातून निर्वासन प्रक्रिया काही तासांत पूर्ण करेल, असे स्पष्ट केले आहे. काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटांमध्ये ८५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १३ अमेरिकन सैनिकांचा देखील समावेश आहे. गुरुवारी काबूल विमानतळावर दोन बॉम्बस्फोटानंतर वृत्तसंस्था एएफपीने तिसरा स्फोट झाल्याची माहिती दिली. काबुलमध्ये आणखी स्फोट होण्याची शक्यता असल्याचे अनेक माध्यमांच्या अहवालात म्हटले आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) ने आपल्या दाव्यात या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

ब्रिटिश संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी स्काय न्यूजला सांगितले की, “आम्ही आमच्या लोकांना बाहेर काढत आहोत. सुमारे १,००० लोक आता हवाई क्षेत्राच्या आत आहेत. एकूणच ही प्रक्रिया आता बंद होत आहे, आमच्याकडे फक्त काही तास आहेत.” इस्लामिक स्टेटने आपल्या दाव्यात म्हटले आहे की, त्यांनी अमेरिकन सैनिक आणि अफगाण नागरिकांना लक्ष्य केले. या स्फोटावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी “हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असे म्हटले आहे.

अफगाणिस्तानातून पलायनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झालेल्या काबूल विमानतळावर आत्मघाती बॉम्बहल्ल्याची भीती अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशांनी आधीच व्यक्त केली होती. अमेरिकी दूतावासाने बुधवारी रात्री काबूल विमानतळाच्या तीन प्रवेशद्वारांजवळ न थांबण्याची सूचना आपल्या नागरिकांना केली होती. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि न्यूझीलंडनेही आपल्या नागरिकांना विमानतळावर न जाण्याचे आवाहन केले होते. अखेर या देशांची भीती खरी ठरली. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत अनेकजण ठार झाले. मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चांगलेच संतपाल्याचं पहायला मिळत असून त्यांनी या हल्ल्याचा हिशेब चुकता केला जाईल, असा इशारा दिलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button