breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

“आपण कुणाच्या भानगडीत पडत नसतो, आपला नाद करायचा नाय”

पंढरपूर – आपण कोणाच्या भानगडीत नसतो आणि आपला नाद कोणी करायचा नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी उमेदवार भागीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणं कोणा येड्या गबाळ्याचं काम नाही, अशी बोचरी टीका अजित पवारांनी फडणवीसांवर केली आहे.

राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. तसेच राज्यातील आघाडी सरकार पाडणं म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

अजित पवार यांनी आज चंद्रकांत पाटील यांचा उल्लेखही ‘चंपा’ असा करत ते उद्या येथे येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं म्हणत अजित पवारांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावरही जरोदार टीकास्त्र सोडलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button