breaking-newsताज्या घडामोडीपुणे

संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

पुणे |

पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (२० मे) विद्युत आणि पंपिंग तसेच स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२१ मे) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. पाणी जपून वापण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत.

  • पर्वती जलकेंद्र

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्माावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता, मिठानगर, शिवनेरीनगर आणि पद्माावती

  • वडगाव जलकेंद्र

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक चतु:शृंगी- एसएनडीटी, वारजे जलकेंद्र पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी आणि भूगांव रस्ता

  • लष्कर जलकेंद्र

लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महमंदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर आणि सातववाडी

  • नवीन होळकर पंपिंग

विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि नगर रस्ता

वाचा- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची त्यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button