TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार लांडगे यांच्या पुढाकारातून मोशी, डुडुळगावमधील पाणी प्रश्न निकाली!

  • मोशी-आळंदी बीआरटी रस्त्यावर पाण्याची लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात
  • सोसायटी फेडरेशनच्या सदस्यांनी मानले आभार

पिंपरी | प्रतिनिधी

मोशी, डुडुळगावमधील नागरिकांच्या पाणी प्रश्न आता निकाली निघाला आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून मोशी-आळंदी बीआरटी रस्त्यावर नवीन 400 मीमी व्यासाची पाण्याची लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. काही दिवसात या पाईप लाईनमुळे मोशी तसेच डुडुळगाव परिसरातील नागरिकांना व्यवस्थित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार असून, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोशी-आळंदी बीआरटी रस्त्यावर
नवीन 400 मीमी व्यासाची पाण्याची लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.या कामाची पाहणी मनपाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी (दि.4) केली.
यावेळी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, स्वीयसहायक ऋषभ खरात, फेडरेशनचे उपाध्यक्ष धिरज सिंग, नक्षत्र आयलँड सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबतची माहिती चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली. ते म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी मोशी येथील नक्षत्र आयलँड सहकारी गृहरचना संस्था( सोसायटी) तसेच डुडुळगावमधील सोसायट्यांच्या पाण्याच्या समस्यांबाबत भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याबरोबर दोन महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड पाणीपुरवठा अधिकारी , तसेच नक्षत्र आयलँड सोसायटी व इतर सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीमध्ये मोशी व डुडुळगाव मधील सर्व सोसायट्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मोशी-आळंदी बीआरटी रस्त्यावर नवीन 400 मी मी व्यासाची पाण्याची लाईन टाकण्याच्या सूचना आमदार लांडगे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या बीआरटी रस्त्यावरील पाण्याच्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले असून मनपाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी (दि.4) या ठिकाणी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली . पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी ..
दिले.

भोसरी लगतच्या उपनगरीय भागांमधील
सोसायट्यांच्या समस्यामध्ये सतत लक्ष घालून सर्व सोसायट्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार महेश लांडगे करीत आहेत त्यांच्या दुरदृष्टीमुळेच या उपनगरीय भागातील पाणी समस्या निकालात निघत आहे.चिखलीमध्ये 348 एमएलडी पाण्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्णत्वास येत आहे.याचे काम जवळजवळ पूर्ण झालेले आहे , त्यामुळे भविष्यात या सर्व समाविष्ट गावतील सोसायट्या व गावठाणातील सर्व बैठ्या घरांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

– संजीवन सांगळे 
अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button