breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादीतील दूरदृष्टीच्या अभावामुळेच पिंपरी-चिंचवडकरांना पाणी समस्या!

  •  पवना जलवाहिनी, आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्प कुणामुळे रखडला
  •  राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना भाजपाच्या उज्ज्वला गावडे यांचा सवाल

पिंपरी । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत असताना सुरू केलेला पवना जलवाहिनी प्रकल्प चुकीच्या धोरणांमुळे रखडला. त्यामुळे ३०० कोटी रुपयांमध्ये होणारा हा प्रकल्पा आता १ हजार कोटींपर्यंत खर्चावर गेला आहे. राष्ट्रवादीने केलेले हे पाप पिंपरी-चिंचवडकरांच्या माथी मारण्यात येत आहे. आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पालाही राष्ट्रवादीतील दूरदृष्टीच्या अभावामुळे दिरंगाई झाली. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाण्याबाबत बोलताना माहिती घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे यांनी केली.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पिंपळे गुरव येथील कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी पिंपळे गुरवमध्ये पहाटे चार वाजता पाणी येते. त्यासाठी महिलांना पहाटे चार वाजता पाणी भरण्यासाठी उठावे लागते. त्यामुळे आता पाण्याची वेळ बदला अशी मागणी न करता नगरसेवक बदला म्हणण्यची वेळ आली आहे, अशी टीका चाकणकर यांनी केली होती. त्याला भाजपा महिला शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे यांनी प्रत्यूत्त्र दिले आहे.

उज्ज्वला गावडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात २००८ मध्ये सुरू केलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प आद्यापपर्यंत रखडला आहे. या प्रकल्पाचा खर्च चारपट वाढला असून, त्याचा बोजा पिंपरी-चिंचवडकरांवर पडणार आहे.

दुसरीकडे, आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाचे पाणी आरक्षण देण्यासाठी सुरवातीला आघाडी सरकारने विलंब केला. पुण्यापेक्षा ३ वर्षांनी उशीरा पाणी आरक्षण दिले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदासीनतेमुळे आरक्षण रद्द झाले. पुणे शहराच्या प्रकल्पाला मंजुरी मिळून १० वर्षे झाली आता प्रकल्प कार्यान्वयीत झाला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडसाठीच्या प्रकल्पाचे काम उशीरा मंजुरी मिळूनही सुरू झाले आहे. परंतु, रुपाली चाकणकर निवडणुकीच्या तोंडावर पाण्याच्या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी शहराच्या प्रश्नाबाबत सखोल माहिती घ्यावी आणि मग वक्तव्य करावे, असेही गावडे यांनी म्हटले आहे.

तसेच, २०१७ पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शहराचा पाणीपुरवठा सक्षम करण्याबबात काय उपाययोजना केल्या आहेत? याची माहिती चाकणकर यांनी महापालिका पाणीपुरवठा विभागातून घ्यावी, असे आव्हानही उज्ज्वला गावडे यांनी दिले आहे.

  • महापौरांचा अवमान केल्याबद्दल माफी मागावी…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असतानाही रुपाली चाकणकर पक्षाच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आल्या. त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर उर्फ उषा ढोरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले आहे. महिला असतानाही ढोरे यांनी सक्षमपणे शहराचे महापौरपद भूषवले. याबाबत एक महिला म्हणून आदर बळगला पाहिजे. पण, चाकणकर यांनी ‘‘महापौर नेमक्या काय बोलतात, हे त्यांचे त्यांनाही कळत नाही’’ अशी आत्मपौढी मिरवण्याचा प्रयत्न केला आहे. महापौर ढोरे यांचा अवमान म्हणजे पिंपरी-चिंचवडकरांचा अवमान आहे. अशा राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवड कदापि थारा देणार नाहीत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी पिंपरी-चिंचवडच्या महापौरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही उज्ज्वला गावडे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button