breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आजही जोरदार पावसाचा इशारा; रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट

मुंबई – कोकणात झालेल्या तुफान पावसामुळे चिपळूण, महाड, खेड, संगमेश्वर या भागांत पुराने वेढा घातला आहे. त्यानंतर आज शुक्रवारीदेखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज, २३ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता आहे.

तसेच उद्या, २४ जुलै रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २५ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई, पालघर, ठाणे, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेच २६ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button