ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ वेळेत पूर्व मुक्त मार्ग बंद राहणार

मुंबई | प्रतिनिधी

जून ते डिसेंबरमध्ये काही दिवस वाहतूक थांबणार

 मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (एमटीएचएल) रॅम्पची पूर्व मुक्त मार्गाला जोडणी देण्याच्या आणि वरळी-शिवडी मार्गाच्या शिवडी बाजूकडील पूर्व मुक्त मार्गावरून जाणाऱ्या रॅम्पचे काम जूनमध्ये सुरू होणार आहे. या कामासाठी जूनपासून डिसेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी पूर्व मुक्त मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

एमटीएचएलचे काम वेगाने सुरू असून सध्यस्थितीत प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यावर दक्षिण मुंबई, पूर्व उपनगर आणि वरळीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना एमटीएचएलवरून थेट पूर्व मुक्त मार्ग आणि वरळी शिवडी जोडरस्त्याने इच्छित स्थळी पोहचण्यासाठी रॅम्प उभारला जात आहे. रॅम्पचे काम सध्या वेगाने सुरू आहे.

एमटीएचएलची जोडणी पूर्व मुक्त मार्गाला देण्याचे काम जूनपासून सुरू होणार आहे. तर वरळी शिवडी जोडरस्त्याचा रॅम्प हा पूर्व मुक्त मार्गावरून जाणार आहे. अभियांत्रिकी दृष्टीने हे काम किचकट असणार आहे. यासाठी मोठ्या क्रेन वापरल्या जाणार असून रॅम्पवर गर्डर बसविले जाणार आहेत. तसेच या कामादरम्यान मुक्त मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामासाठीही काही काळ पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. त्याचे नियोजन एमएमआरडीएने केले असून, जून ते डिसेंबर या कालावधीत रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत हा मार्ग वाहनांसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. २००९ मध्ये पूर्व मुक्त मार्गाची निर्मिती झाल्यावर पहिल्यांदाच मोठ्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button