breaking-newsमहाराष्ट्र

#Waraginestcorono:अंबरनाथचा उद्योजक राज्य सरकारला हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या 15 लाख गोळ्या मोफत देणार

ठाणे : महाराष्ट्र आणि संपूर्ण देश सध्या कोरोनाशी लढतो आहे. या लढाईत रामबाण उपाय म्हणून लस सापडलेली नसली तरी काही पर्यायी औषधं परिणामकारक ठरत आहेत. हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्या या त्यापैकीच एक आहेत. या गोळ्यांसाठी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे केली. याच औषधांची महाराष्ट्रातही गरज असताना अंबरनाथच्या एका मराठी उद्योजकाने राज्य सरकारला खंबीर साथ दिली आहे. या उद्योजकाने महाराष्ट्र सरकारला हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या तब्बल 15 लाख गोळ्या मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राची हायड्रोक्सीक्लोरीक्वीनची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे. यामुळे महाराष्ट्राला कोरोनाशी लढण्यात मदच होणार आहे.

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही हायड्रोक्सीक्लोरीक्वीन गोळ्यांसाठी भारताची गरज लागली. याच हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्या अंबरनाथ एमआयडीसीतील रुबीकॉन कंपनीत तयार केल्या जात आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या गोळ्या फक्त महाराष्ट्र सरकारला आणि त्यादेखील मोफत दिल्या जाणार आहेत. कोरोनानं जगभरात थैमान घातल्यानंतर या गोळ्यांचं उत्पादन करण्याचा निर्णय रुबीकॉन कंपनीचे मालक सुमंत पिळगावकर यांनी घेतला. तसेच ते या गोळ्या फक्त महाराष्ट्र सरकारला देणार असून यासाठी सरकारकडून एकही रुपया घेणार नाहीत. रुबीकॉन कंपनीनं आत्तापर्यंत अशा एक लाख गोळ्या दिल्या आहेत. भविष्यात एकूण 15 लाख गोळ्या सरकारला देण्याचा कंपनीचा निर्धार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button