breaking-newsराष्ट्रिय

#Waragienstcorona:केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा ठरल्या ‘कोविड-१९ रणरागिणी’

मुंबई : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी नेमकं काय करायला हवं? हा प्रश्न प्रत्येक देशांना पडला असताना. भारतातील केरळ राज्यांना सगळ्यांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. यामुळे केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा यांच जगभरात कौतुक होत आहे. 

२० जानेवारी रोजी आरोग्यमंत्री शैलजा यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. त्यांनी चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसची माहिती ऑनलाईन वाचली आणि अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की,’हे आपल्याकडे भारतात येईल का?’ तेव्हा अधिकाऱ्यांनी ‘हो नक्कीच’. तेव्हापासूनच आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी कोरोनाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली. 

महत्वाची बाब म्हणजे यानंतरच भारतात बरोबर ११ दिवसांनी सर्वात पहिला कोरोनाबाधित रूग्ण हा केरळमध्ये सापडला होता. ३० जानेवारी रोजी केरळमध्ये पहिला कोरोनाबाधित रूग्ण सापडला. जवळपास साडे तीन महिन्यानंतर केरळमध्ये ६०१ लोकांना कोरोनाची लागण झाली असून चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

महत्वाचं म्हणजे केरळमधील कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही. केरळमधील कोरोना समाजात पसरलेला नाही. केरळची लोकसंख्या ही साडे तीन करोड लोकसंख्या असून युकेची लोकसंख्या ही केरळच्या दुप्पट आहेत. युकेमध्ये आता ४० हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत ८२ हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ६३ वर्षीय आरोग्य मंत्री शैलजा या पेशाने शिक्षिका होत्या. आरोग्य मंत्री शैलजा या जगभरात कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या ‘खेळाडू’ आणि ‘रॉकस्टार हेल्थ मिनिस्टर’ म्हणून चर्चा होत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button