breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#waragainstcorona: विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता अधिका-यांची नियुक्ती: जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण  करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेअन्वये विस्थापित कामगार यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी  व इतर व्यक्ती यांचे प्रवासाकरीता आदेश निगर्मित केले आहेत. या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आले आहे तसेच अधिकारी, कर्मचा-यांची आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

          उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे ( मो.नं.9423043030) व तहसिलदार, संजय गांधी योजना,पुणे शहर श्रीमती रोहिणी आखाडे ( मो.नं. 9226373191),अव्वल कारकून ( महसूल शाखा) कैलास बांडे, लिपीक (महसूल) अंकुश गायकवाड, लिपिक, (संजय गांधी योजना) तहसिल कार्यालय श्रीमती आफरीन शेख यांचेकडे पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये, जिल्हयात जाणा-या स्थलांतरित कामगारांसाठी त्या-त्या संबंधित राज्य, जिल्हयाकडून परवानगी घेणे तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झालेबाबतची खात्री करणे, परवानगी पत्र तयार करुन घेणे. व त्यांना संबंधित त्या-त्या  राज्यामध्ये, जिल्हयामध्ये पाठविण्याची व्यवस्था करणे तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B         ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे

          उपजिल्हाधिकारी भूसंपादन निता सावंत ( मो.नं. 9421118446),तहसिलदार ( महसूल शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय  विवेक जाधव ( मो.नं.9421215678),  अव्वल कारकून ( महसूल शाखा) योगेश कुंभार, अव्वल कारकून ( महसूल शाखा) श्रीमती सारिका चौधरी, लिपिक ( महसूल शाखा) शशिकांत वाघ यांचेकडे पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये, जिल्हयात जाणा-या स्थलांतरित, विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटनासाठी त्या-त्या संबंधित राज्य, जिल्हयाकडून परवानगी घेणे तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झालेबाबतची खात्री करणे. परवानगी पत्र तयार करुन घेणे. व त्यांना संबंधित त्या-त्या राज्यामध्ये, जिल्हयामध्ये पाठविण्याची व्यवस्था करणे तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे

          उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय (स्वागत शाखा) अमृत नाटेकर ( मो.नं. 9834468894/ 9422616033), तहसिलदार,जिल्हाधिकारी कार्यालय ( पुनर्वसन शाखा) श्रीमती स्मिता पवार, अव्वल कारकून ( स्वागत शाखा) आदेश दुनाखे, अव्वल कारकून (पुनर्वसन शाखा) संतोष भालेरे, लिपीक (पुनर्वसन शाखा) यांचेकडे बाहेरच्या राज्यातून, जिल्हयातून पुणे जिल्हयात येणा-या स्थलांतरित विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक यांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे, तसेच संबंधितांना त्यांचे रहिवास ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करावी, तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे

          उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.3 श्रीमंत पाटोळे (मो. नं. 9075748361), तहसिलदार (पुनर्वसन शाखा)  बालाजी सोमवंशी ( मो.नं.8308127992), अव्वल कारकून ( पुनर्वसन शाखा) जितेंद्र पाटील, लिपीक (पुनर्वसन शाखा) मिलींद पोळ, मंडल अधिकारी ( भूसंपादन क्र.3) राजेंद्र वाघ यांच्याकडे बाहेरच्या जिल्हयातून पुणे जिल्हयात येणा-या स्थलांतरित कामगार ( परराज्यात / जिल्हयात येणारे) यांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे, तसेच संबंधितांना त्यांचे रहिवास ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करावी, तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे .

संजय पवार, उपजिल्हाधिकारी (मो.9850032095), सहाय्यक श्रीमती विमल डोलारे, , श्रीमती शुभद्रा पंडीत, अ.का.सर्वसाधारण शाखा, श्रीमती छाया सानप, लिपिक, सर्वसाधारण शाखा, श्रीमती सरिता नेहरकर, लिपिक, लेखा शाखा यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांचेशी समन्वय साधून कोरोना या संसर्ग आजाराचा पुणे जिल्हयामध्ये जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे. सर्व शासकीय , निमशासकीय आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण संबंधित यंत्रणेकडून देण्यात आले आहे. किंवा कसे याबाबतची खात्री करुन अहवाल नियंत्रण  कक्षास सादर करणे. कंटेनमेंट प्लॅनचा काळजीपूर्वक अभ्यास करुन आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी समन्वय करुन यासंदर्भात समन्वय अधिकारी यांची क्षमता बांधणी करणे. विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक व स्थलांतरित कामगार, इतर व्यक्ती इतर राज्यात, जिल्हयात वैयक्तीक स्वत:च्या वाहनाने जाणा-या व्यक्तींकरिता पासेस देण्याची कार्यवाही करणे. माहिती नियंत्रण कक्षाला कळविणेत यावी.

          नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी श्री. हिम्मत खरोड, (मो. 9422072572). सहाय्यक अधिकारी व कर्मचारी  श्रीमती रुपाली रेडेकर, तहसिलदार निवडणूक शाखा, श्रीमती नेहा चाबुकस्वार, नायब तहसिलदार, श्री. योगेश ब्रम्हे, अ.का., श्री.सचिन कोकाटे, अ.का., श्रीमती पुजा नाईक, अ.का., श्रीमती शितल शिंदे, लिपिक, श्री. संदिप पवार, लिपिक शासन आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1, दिनांक 17.04.2020 प्रमाणे सर्व प्रकारचे पासेस देणे. पुणे जिल्हयात व इतर ठिकाणावरुन पास बाबत दुरध्वनी व ई-मेलव्दारे येणा-या तक्रारी व विचारणा करणा-या नागरिकांना मार्गदर्शन करणे. दररोज  अहवाल नियंत्रण कक्षास सादर करणे. तसेच अत्यावश्यक व वैद्यकीय व्यक्तींना पास देण्याची कार्यवाही करणे.

          उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संजीव भोर (मो. 9422221114), उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड श्री. विनोद सकरे, (मो. 8605837070) उपरोक्त नोडल अधिकारी यांना विद्यार्थी यात्रेकरु, पर्यटक व स्थलांतरित कामगार, इतर व्यक्ती (परराज्यात, जिल्हयात येणारे व जाणारे) यांची प्रवास मार्गनिहाय वाहतूक व्यवस्था करणेकरिता नोडल अधिकारी यांचेशी समन्वय साधून कार्यवाही करणे बाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राम यांनी नुकताच याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button