breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

waragainstcorona : मावळातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासन सतर्क : आमदार सुनील शेळके

  • देहूरोड कॅन्टोमेंट येथील आरोग्य यंत्रणेची पाहणी
  • एम. बी. कॅम्प शाळेत १०० बेडचे विलगीकरण कक्ष

देहूरोड । प्रतिनिधी

मावळ तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण, पुण्यातून देहूरोड येथे आलेल्या एका कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मात्र, प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून तालुक्यातून कोरोनाला आम्ही हद्दपार करणार आहोत, असा निर्धार आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड येथे आमदार शेळके यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी प्रशासकीय आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले की, रुग्णवाहिका, औषधे, बेडची व्यवस्था इतर सुविधांची उपलब्धता याबाबत प्रशासन सतर्क आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने एम. बी. कॅम्प शाळेत 100 बेडचे विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. तसेच, देहूरोड शहराचे दहा विभाग तयार करून कॅन्टोन्मेंटचे दोन अधिकारी, एक पोलिस कर्मचारी व इतर टीम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन पद्धतीने देखरेख करणार आहेत. देहूरोडकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन गांभीर्याने काम करीत आहे. प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार शेळके यांनी केले.

पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा…

मावळ तालुक्यात आजवर एकही कोरोनाबाधित आढळला नाही. पण, देहूरोडमधील एक भाजीविक्रेता पुण्यातील हडपसर येथे राहणाऱ्या कुटुंबियांना देहूरोडमध्ये पहाटे टेम्पोमधून घेवून आला. सतर्क नागरिकांनी याची माहिती प्रशासनाला कळवली. त्यांची तपासणी केली असताना त्या कुटुंबातील दोन मुली कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. देहूरोड कॅन्टोमेंट हद्दीत ज्या सुविधा मिळत नाहीत. त्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अत्यावश्यक सुविधा देहूरोडमध्ये पुरवाव्यात, याबाबत आदेश दिले आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही करीत आहोत. नागरिकांनी आजपर्यंत जसे नागरिकांनी सहकार्य केले. तसे यापुढेही करावे. संबंधित कोरोनाबाधित मुली लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत, असेही आमदार शेळके यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button