breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: तालुका प्रशासनाला वैद्यकीय सामुग्री पोहोचली; आमदार सुनील शेळके यांची ‘आश्वासनपूर्ती’

– ५० लाख रुपयांचे वैद्यकीय साहित्य तालुका प्रशासनाला पोहोचले

– तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहन

तळेगाव दाभाडे । महाईन्यूज। प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत व्हावी. यासाठी वैद्यकीय साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्याबाबत आमदार सुनील शेळके यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्याअंतर्गत खरेदी करण्यात आलेली सामुग्री तालुका प्रशासनाकडे पोहोचला आहे. त्यामुळे आमदार शेळके यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली, अशी भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

‘आमदार स्थानिक विकास कार्यक्रम’ अंतर्गत २०१९-२०, कोव्हीड-१९ विषाणुमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परीस्थितीमध्ये परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यक वैद्यकिय सामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी ५० लाख पर्यंत निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्याद्वारे उपलब्ध झालेल्या थर्मल गन, पीपीई कीट, N95 मास्क, सॅनिटायझर इ. वैद्यकीय सामुग्री, साहित्याचे वाटप शनिवारी करण्यात आले.

यावेळी तहसीलदार मधुसुदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वैद्यकीय अधिकारी जी.जी. जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, सभापती, जि.प.सदस्य बाबुराव वायकर, लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन पवार, तळेगाव दाभाडे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, तालुका अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, डॉ. जगताप, सुभाष जाधव, दिपक हुलावळे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा माया चव्हाण, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, रा.यु.जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, सरपंच विजय सातकर, उपसरपंच गिरीष सातकर, सदस्य किशोर सातकर, महेश सातकर, आरिफ मुलानी, नवनाथ सातकर, सुदाम कदम, लोणावळा नगरसेवक मुकेश परमार, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेविका मंगलताई भेगडे, संगीताकाकी शेळके, डॉ.दिलीप भोगे, रामचंद्र कारंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोरोना योद्धांच्या कार्याला सलाम…

महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार सुनील शेळके यांनी कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे. तसेच,  राज्याचा खरा कणा असलेला शेतकरी, कामगार, कष्टकरी अशा व्यक्तींना सन्मान आणि प्रतिष्ठा देणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याप्रती संवेदनशीलता बाळगून त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आमदार शेळके यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यात आला.  आमदार शेळके म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून नगरपरिषद, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, मेडिकल दुकानदार , आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छता, आरोग्य विषयक उपक्रम राबविणारे मंडळ, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अन्नदान- अत्यावश्यक सेवा पुरविणारे इ. आपल्यासाठी काम करत आहेत. या सर्वांचे समाजाप्रती काम खरंच प्रशंसनीय ठरले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात तुम्ही करत असलेल्या कार्याची तुलना होऊ शकत नाही. तुमच्या कार्याला आमचा सलाम, असेही आमदार शेळके यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button