#waragainstcorona: कंटेन्मेंट झोन मधील दारू विक्रीची दुकानं बंद राहतील : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड व पुणे शहर हे रेड झोन असूनही उद्या 4 मे पासून मद्य विक्रीला राज्य सरकार कडून हिरवा झेंडा मिळाला आहे, मात्र शहरातील कंटेन्मेंट झोन मधील दारू विक्रीची दुकानं बंद राहतील.
गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन संपणार व मद्य विक्री सुरू होणार याची चर्चा रंगली होती, तर काल केंद्रीय गृहमंत्रालयाने ग्रीन आणि ओरेंज झोन मधील दुकान सुरू करण्यास जाहीर केले, मात्र रेड झोन मधील मद्यप्रेमींच्या आशेवर जणू पाणीच. परंतु आज राज्य सरकार कडून रेड झोन मधील (कंटेन्मेंट झोन वगळता) वाईन शॉप उघण्याच्या निर्णयावरून रेड झोन मधील मद्यप्रेमींमध्ये मोठी आनंदाची लहर पसरली आहे. बार अँड रेस्टॉरंट उघण्याच्या आदेश अजूनही दिलेले नाहीत.
मात्र दुरुच्या दुकानांवर लोकांची गर्दी होऊ नये म्हणून विक्रेत्यांनी येसाजी काळजी घ्यायची आहे आणि सोशल डिस्टनसिंगचा काटोकारपणे पालन करावयाचे आहे व एकावेळी 5 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होऊ नये असे आवाहन ही राज्य सरकारने केले आहे.