breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Corona : लाॅक डाऊन च्या काळात रेडक्राॅस चे सैनिक रस्त्यावर!

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

सध्याच्या कोरोना 19 मूळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाॅक डाऊन च्या काळात रेडक्राॅस चे सैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

आज रेडक्राॅस च्या माध्यमातून   कॅम्प च्या  न्यू मोदीखाना या भागात  मोफत वैद्यकीय  शिबिराचे आयोजन करण्यात आले .त्या भागातील  सुमारे 200 लोकांना तपासुन गरजूंना  मोफत  औषधे देण्यात आली. सोशल डिस्ट्नसिंग चे भान ठेउन, सॅनिटेशन ची काळजी घेत      शिबिराचे आयोजन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष डाॅ विक्रम फाटक  सचिव  प्रो  आर वी  कुलकर्णी, माब्रिन  नानावटी,  सतीशचंद्र कांकरिया   इतर पदाधिकारी उपस्थित होते. ह्या फिरत्या दवाखान्याच्या उपक्रमात डाॅ  जगताप, सिस्टर यास्मिन ,सचिन परदेशी ,, दिपक शहा, यांनी भाग घेतला . शिबिराचे आयोजन डाॅ राजकुमार शहा यांनी केले.

ऊद्या ही   सकाळी 10 ते 12 या काळात  सोलापूर बाजार येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे  तरी नागरिकांनी ह्या मोफत सेवेचा लाभ घ्यावा, अशी माहिती डिझास्टर रिलिफ कमिटीचे चेअरमन डॉ. राजकुमार शहा यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button