breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Corona : पुण्यात आज मध्यरात्रीपासून कर्फ्यू…रुग्ण 37; मृत्यूचा आकडा 16

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मध्यवर्ती पुण्यातील चार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोठ्या परिसरामध्ये आज रात्रीपासून कर्फ्यू लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. कर्फ्यू लागू झाल्यानंतर या भागातील लोक कोणत्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडू शकणार नाहीत. फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक गरज पडल्यास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकतील. पुण्यातील पुढील भागांमध्ये हा कर्फ्यु लावण्यात आला आहे.


खडक पोलिस स्टेशन हद्द
मक्का मस्जीद, शहीद भगतसिंग चौक, चांदतारा चौक, घोरपडे पेठ वगैरे.

फरासखाना पोलिस स्टेशन
कागदीपुरा, मंगळवार पेठ, गाडीतळ चौक, कामगार पुतळा,

स्वारगेट पोलिस स्टेशन
मीनाताई ठाकरे वसाहत कमान , महर्षी नगर ते गिरिधर भवन चौक

कोंढवा पोलिस स्टेशन
अशोका म्युज सोसायटी, आशीर्वाद चौक, मिठानगर चौक, भौरोबा मंदीर, ब्रम्हा एव्हीन्यू, गंगाधाम रोड

महर्षीनगर ते आरटीओ कार्यालयाच्या दरम्यान पुण्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, कसबा, रास्ता या पेठा, स्वारगेट, गुलटेकडी, मार्केटयार्ड, खडकमाळ वगैरे भागांचा समावेश होतो. या भागात कोरोनाचे 37 पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. तर कोंढवा भागात पाच पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. त्याचबरोबर हा सगळा परिसर दाट लोकवस्तीचा आहे.हा परिसर सील केल्यानंतर या भागातील कोणालाही या परिसरातुन बाहेर पडता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात जाता येणार नाही. या परिसरातील गल्ली- बोळातील सगळे रस्ते बॅरीकेडींग करुन सील करण्याच्या सुचना महापालिकेकडून पोलिसांना केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button