breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Coroana: पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना किमान दोन महिन्यांचे राशन द्या: नगरसेवक सचिन भोसले

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील गरजु नागरिकांना किमान दोन महिन्यांचे राशन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या चालू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व प्रकारचे रोजगार बंद आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातल मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अनेक नागरिकांकडे रेशनकार्ड नाही, तर काही नागरिकांचे रेशनकार्ड काही कारणास्तव बंद आहे. अशा नागरिकांना रेशन मिळत नसल्याने त्यांच्या लहान मुलांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच, अन्नधान्याच्या शोधात हे नागरिक सर्वत्र फिरत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याचा धोकाही विषाणु बरोबर उपासमारीनेसुद्धा मरण्याची वेळ येवू शकते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने नगरपालिकेच्या खर्चातून शहरातील नागरिकांना किमान दोन ते तीन महिन्यांचे रेशन उपलब्ध करुन द्यावे. त्यासाठी प्रशासनाने गरजू नागरिकांचे लवकरात लवकर सर्वेक्षण करावे, अशी मागणीही भोसले यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button