Views:
101
एका सोहळ्यातील वयस्कर आजीआजोबांचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बॉलीवूड गाण्यांवर नृत्य करतानाचा हा व्हिडिओ ट्विटरवर IAS ऑफिसर अवनिश शरण यांनी शेयर केला आहे.
प्रेक्षकांकडून या व्हिडिओला भरपूर दाद मिळत आहे. या जोडीने सर्वप्रथम रणबीर कपूरच्या संजू चित्रपटातील ‘मैं बढीया, तू भी बढीया…’ या गाण्यावर डान्स केला. यानंतर त्यांनी अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोर के झटका…’ गाण्यावर नाच केला. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
IAS ऑफिसर अवनिश शरण यांनी शेयर केलेल्या व्हिडिओला त्यांनी ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ हे शिर्षक दिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 19 हजार लोकांनी पाहिला आहे.
Like this:
Like Loading...