breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी विराजदादा लांडे युथ फाउंडेशनकडून महारक्तदान शिबिराचे आयोजन

  • कोरोना संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विराज लांडे यांनी घेतला पुढाकार

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. त्यात रुग्णालयामधील रक्तपेढयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळत नाही. त्यामुळे उपचार करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. या अपुऱ्या रक्तसाठ्याची बाब हेरून भोसरीतील विराजदादा लांडे युथ फाउंडेशनने उद्या शुक्रवारी (दि. ३० एप्रिल) ते शनिवारी (दि. १ मे) महाराष्ट्र दिनी भोसरी परिसरात दोन दिवसीय महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

याबाबत माहिती देताना विराज लांडे म्हणाले की, पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रक्तपेढीसह शहरातील इतर रुग्णालयात सद्यस्थितीत १० दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. सिकलसेल, थैलेसिमिया, रक्तक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेचे असते. त्यामुळे रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प आहे.

अशा परिस्थितीत आम्ही फाउंडेशनच्या मदतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त संकलनाचे काम हाती घेतले आहे. हे दोन दिवसीय रक्तदान शिबीर भोसरीमधील लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालय आवारात सकाळी ७.३० ते सायं. ५ या वेळेत संपन्न होणार आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ९९७००१७००१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि तरुणांनी रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन लांडे यांनी केले आहे.

”कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्वांसाठीच दिलासादायक बाब आहे. त्यामध्ये सर्वाधिक तरुण वर्गाचा समावेश असेल. मात्र लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यांनाच रक्तदान करता येणार नसल्याने शहरात रक्ताचा तुटवडा आणखी तीव्र जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वानीच या महारक्तदान शिबिरात सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणत रक्त संकलित करण्यास हातभार लावावा.”
– विराज लांडे, अध्यक्ष – विराजदादा लांडे युथ फाउंडेशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button