breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहू-आळंदी रोडवर सांडलेला मुरूम हटवण्यासाठी विनायक आबा मोरे स्पोर्ट्स फाउंडेशनची मोहीम

पिंपरी l प्रतिनिधी

टाळगाव चिखली येथे देहू-आळंदी रोडवर भाजी मंडई समोर एका गाडीतून मुरूम सांडला. यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला. मोठा अपघात टाळण्यासाठी विनायक आबा मोरे स्पोर्टस फाउंडेशनच्या माध्यमातून मोहीम राबवत रस्त्यावरील मुरुम बाजूला करण्यात आला.

शनिवारी (दि. 26) संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास टाळगाव चिखली येथे देहू-आळंदी रोडवरील भाजी मंडई समोर एक मुरूम घेऊन जाणाऱ्या ट्रक मधून मुरुमाची मोठ्या प्रमाणात गळती झाली. यामुळे रस्त्याच्या मध्यभागी मुरुमाचा थर साचला. या रस्त्यावरून वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्रीच्या वेळी रस्त्यावर मुरूम पसरल्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता होती. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन विनायक आबा मोरे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रस्त्यावर पडलेला मुरूम हटवण्यासाठी तत्काळ मोहीम राबवण्यात आली.

तसेच, परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी होऊन त्रास होऊ नये म्हणून फाउंडेशनच्या वतीने रस्त्याच्या मध्यभागी मातीचा साचलेला ढीग जेसीबी मशीनच्या साहाय्याने दूर करून वाहतूक तत्काळ सुरळीत करण्यात आली. रस्त्याच्या पुष्ठभागावर साचलेली मऊ माती देखील झाडूच्या साहाय्याने हटवण्यात आली. याचबरोबर वाहतूक कोंडी तत्काळ पूर्ववत करण्यात आली. वाहतूक कोंडी तत्काळ पूर्ववत केल्यामुळे नागरिकांनी विनायक आबा मोरे स्पोर्टस फाउंडेशनचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button