ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

पत्नी व साडेचार वर्षांच्या मुलाचा खून करून केला मेहुण्याला व्हिडिओ कॉल

अहमदनगर|श्रीरामपूर तालुक्यातील दिघी गावात रविवारी एक संतापजनक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एकाने आपली पत्नी आणि साडेचार वर्षाचा मुलाचा खून केला. त्यानंतर आपल्या मेहुण्याला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती देत मृतदेह दाखविले. शिवाय नातेवाईकांच्या ग्रूपमध्ये मृतदेहांचे फोटोही शेअर केले. पोलिसांना याची माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दिघी गावात राहणाऱ्या बलराज दत्तात्रय कुदळे (वय ३५) याने पत्नी अक्षदा बलराज कुदळे (वय २८) व शिवतेज बलराज कुदळे (वय साडेचार वर्षे) यांचा खून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून त्याने हे कृत्य केले आहे. त्याने प्रथम पत्नी अक्षदा हिच्या डोक्यात कुदळीने घाव घातला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मुलगा शिवतेज याला घराजवळील आंब्याच्या झाडाला गळफास दिला. त्याचाही यामध्ये मृत्यू झाला.

कुदळे याचा मेहूणा चाकण (पुणे) येथे राहतो. दोघांचा खून केल्यानंतर त्याने मेहुण्याला व्हिडिओ कॉल केला. त्यावरून दोघांचा खून केल्याची माहिती दिली आणि त्यांचे मृतदेहही दाखविले. त्यानंतर नातेवाईकांना मृतदेहांचे फोटो पाठविले. या भयानक कृत्याची माहिती श्रीरामपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत नातेवाईक आणि ग्रामस्थही तेथे धावून आले होते

पोलिसांनी आरोपी कुदळे याला अटक केली आहे. रामनवमीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे संताप आणि हळहळही व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button