breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
दिग्गज ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन
मुंबई – चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन झाले. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. युसूफ यांच्या निधनावर त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केले आहे.
शाहिद-२ चे शेड्युल मी पूर्ण केले आणि अडचणीत सापडलो होतो. माझी चित्रपट निर्माता म्हणून कारकीर्द संपणार होती. तेव्हा त्यांनी मला मदत केली. त्यामुळे मी वाचलो. हे नवीन आयुष्य त्यांनी मला दिले आहे. पण आज मी अनाथ झालो, असे हंसल मेहता यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.