breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

वरद चषक : वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रा. लि.तर्फे बांधकाम क्षेत्रातील लोकांचा गौरव

पुणे :पुण्यात नुकताच एक आगळा वेगळा प्रॉपर्टी महोत्सव पार पडला. बांधकाम आणि विकसन क्षेत्रातील लोकांसाठी तसेच ग्राहकांना आपल्या घरकुलाचे तसेच व्यावसायिक मालमत्ते विषयीचे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी खास ‘वरद प्रॉपर्टी’ सोल्युशन्स प्रा.ली. संस्थे तर्फे प्रॉपर्टी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवात पुण्यातील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले होते. गृहखरेदी आणि व्यावसायिक मालमत्ता घेण्यास उत्सुक असणाऱ्या ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना या महोत्सवात  मध्ये अनेक पर्याय उपलब्ध होते. या अनोख्या महोत्सवाचे वैशिष्ट म्हणजे प्रथमच कोणत्याही प्रकारचे मूल्य न आकारता सर्व बांधकाम व्यवसायिकांना विनामूल्य जागा प्रदर्शनात देण्यात आली होती. या प्रकारची संकल्पना असलेले महोत्सव म्हणजेच “सेल्स ड्रिव्हन एक्स्पो” भारता बाहेर होतात. या मागचा हेतू असा की, जी काही विक्री होईल त्यावर ठरलेले कमिशन प्रदर्शन आयोजकांना बांधकाम व्यावसायिक देतात. परंतु विक्री न झाल्यास सर्व जोखीम महोत्सव आयोजकांची असते.

वरद प्रॉपर्टी तर्फे महोत्सवाचे नियोजन अत्यंत उत्तम होते. वरद प्रॉपर्टी आणि बिल्डर्स या दोघांकडून सुद्धा अत्यंत आकर्षक ऑफर्स या महोत्सवामधे ग्राहकांना देण्यात आल्या होत्या. एकूणच या महोत्सवाला जनतेने भरघोस प्रतिसाद दिला. वरद संस्थेतर्फे महोत्सवातील उत्कृष्ठ सादरीकरण, संकल्पना आणि एकूण कामगिरी या निकषांवर तीन बांधकाम  व्यावसायिकांना साल 2022 चा वरद चषक घोषित करण्यात आला होता. हा चषक वितरण सोहळा हॉटेल जे डब्ल्यू मॅरियट मधे नुकताच पार पडला.

सुमधुर गाण्याच्या मैफिली नंतर उत्तेजनार्थ बक्षिस आणि प्रमाणपत्र वाटप विकासकांना प्रोत्साहित करण्यासाठी वरद संस्थेचे सर्वेसर्वा महेश कुंटे आणि निखिल कुंटे यांच्या हस्ते देण्यात आले. सर्वोत्तम सेल्स परफॉर्मन्स पुरस्कार गार्डियन ग्रुप ला, सेकंड इन बेस्ट सेल्स पुरस्कार  गोदरेज प्रॉपर्टीज तर थर्ड बेस्ट सेल्स पुरस्कार जस्टो ग्रुप  ला मिळाले. वरद तर्फे सध्या चालू असलेल्या लँडसेल्स, फ्लॅट्स विक्री आणि मार्केटिंग बरोबरच भविष्यात भव्य महोत्सव आयोजित करण्याचा मानस यावेळी महेश कुंटे यांनी व्यक्त केला. तसेच लवकरच नाजिकच्या भविष्यात स्वतःचे गृह प्रकल्प बांधणार असल्याची घोषणा संचालक महेश कुंटे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button