breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

लसींमुळेच कोरोनाचे घातक व्हेरियंट तयार होतायत, नोबेल विजेताप्राप्त साथरोगतज्ज्ञाचा दावा

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात हरतर्हेचे प्रयत्न केले जात आहेत. त्यात विशेषकरून लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, याच लसींमुळे कोरोनाचे नवे स्ट्रेन तयार होत असल्याचा खळबळजनक दावा नोबेल पुरस्कारप्राप्त आणि साथरोगतज्ज्ञ प्राध्यापक ल्यूक मॉन्टैग्नियर यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय.

फ्रान्समधील नोबेल पुरस्कारप्राप्त प्राध्यापक ल्यूक मॉन्टैग्नियर यांनी म्हटलंय की, कोरोना प्रतिबंधक लसींमुळेच कोरोना विषाणू अधिक धोकादायक आणि रचनात्मक दृष्ट्या शक्तीशाली होत आहे. कोरोना लसीकरणामुळेच अधिक घातक ठरणारे करोनाचे नवीन नवीन प्रकार समोर येत असल्याचा दावाही मॉन्टैग्नियर यांनी केलाय.

 

मॉन्टैग्नियर यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला एका फ्रेंच पत्रकाराला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी साथरोग तज्ज्ञांना लसींसंदर्भातील दाव्यांबद्दल पूर्ण कल्पना असली तरी ते शांत असल्याचा दावा केलाय. एका प्रश्नाला उत्तर देताना मॉन्टैग्नियर यांनी, “लसींमुळे विषाणूंचा प्रसार थांबत नाही तर त्याचा उलट परिणाम होऊन विषाणू अधिक शक्तीशाली होतात. लसीकरणामुळेच कोरोनाचे नवीन विषाणू हे आधीच्या विषाणूंच्या तुलनेत अधिक नुकसान करत असल्याचं दिसत आहे,” असा दावा केलाय.

 

मॉन्टैग्नियर हे फ्रान्समधील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट म्हणजेच साथरोगतज्ज्ञ आहेत. त्यांना २००८ साली नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांनी व्यक्त केलेली शंका आणि दावा सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी पियरे बर्नेरियास या वरीष्ठ पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये करोनासंदर्भात अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं होता. या मुलाखतीमधील क्लिप सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अमेरिकेतील रेअर फाऊंडेशनने फ्रेंच भाषेतील या मुलाखतीचं भाषांतर केलं आहे.

लसीकरणासंदर्भात मॉन्टैग्नियर यांना जानेवारी महिन्यामध्ये देशात (फ्रान्समध्ये) लसीकरण सुरु झाल्यानंतर नव्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून आलं, यासंदर्भात तुमचं मत काय आहे?, असा प्रश्न विचारण्यात आला. मॉन्टैग्नियर यांनी, “ही अशी एक वैज्ञानिक आणि वैदयकीय क्षेत्रातील चूक आहे जिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचा नोंद इतिहासात केली जाईल. कारण लसीकरणामुळे नवीन विषाणू तयार होत आहेत,” असं उत्तर दिलं. आपलं म्हणणं पटवून देताना मॉन्टैग्नियर यांनी लस दिल्यानंतर शरीरामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज कशा बनतात हे सांगतानाच अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण झाल्याने विषाणू शरीरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडवून आणतो, असं म्हटलं आहे.

प्रत्येक देशामध्ये करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून येत आहे असं तुम्हाला दिसून येईल. लसीकरणाचा आलेख आणि मृतांचा आलेख जवळजवळ समान असल्याचं अनेक देशांमध्ये दिसून येत असल्याचं निरिक्षणही मॉन्टैग्नियर यांनी नोंदवलं आहे. मी या साऱ्यावर बारीक लक्ष ठेऊन आहे. लस घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर काही प्रयोग करत आहे. यामधून मला एक गोष्ट दिसून आलीय की असे काही विषाणू तयार होत आहेत ज्यांच्यावर ही लस प्रभावी ठरणार नाहीय. या अशापद्धतीला वैद्यकीय भाषेत अ‍ॅण्टीबॉडी-डिपेंडंट एनहान्समेंट म्हणजेच एडीई असं म्हटलं जात असल्याचंही मॉन्टैग्नियर म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button