breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ब्रिटनमध्ये १२ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला मान्यता

लंडन | टीम ऑनलाइन
कोरोना व्हायरसचा नवीन आणि अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट ओमिक्रॉनने ब्रिटनमधील परिस्थिती अधिक बिकट केली आहे. दरम्यान, ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ होत असताना, आता ब्रिटीश नियामकाने 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरची लस वापरण्यास मान्यता दिली आहे. ब्रिटन लसीच्या बूस्टर डोससाठी मोहीम तीव्र करण्याची तयारी करत आहे.

सध्या ब्रिटनमध्ये दररोज नवीन प्रकरणांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहे. ब्रिटनच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) ने सांगितले की, फाइझर-बायोएनटेकची लस 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी “सुरक्षित आणि प्रभावी” असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर त्याचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी, ब्रिटन लसीच्या बूस्टर डोससाठी मोहीम तीव्र करण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सेल्फ आयसोलेशचा कालावधी केला कमी

ब्रिटनने कोरोनाची लागण झालेल्या लोकांसाठी सेल्फ आयसोलेशनचा कालावधी 10 दिवसांवरून सात दिवसांवर आणला आहे. नियमांमधील बदल यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (UKHSA) यांच्याशी सल्लामसलत करून करण्यात आला असल्याचे ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सांगितले.

लसीकरण व मास्क हाच ओमिक्रॉनवर प्रभावी उपाय

ओमिक्रॉन या कोरोनाच्या) नव्या प्रकारापासून स्वतःला वाचवायचे असेल तर, लसीकरण(vaccination) व सतत मास्क वापरणे हाच उपयुक्त व परिणामकारक उपाय आहे, असे निरीक्षण दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नोंदवले आहे. या प्रकाराच्या घातक क्षमतेबाबतचा अंदाज आला की सध्याच्या लसींमध्ये काही बदल करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button