पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू : सोमवारी आठ केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन लस

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांना सोमवारी (दि. 3) आठ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस मिळणार आहे. तर 18 वर्षांपुढील नागरिकांना सोमवारी ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलांना खालील केंद्रांवर मिळणार लस

ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल अजमेरा, नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, जुने भोसरी रुग्णालय, काळभोर गोठा उर्दू शाळा यमुनानगर, नवीन जिजामाता रुग्णालय, कासारवाडी दवाखाना

18 वर्षांवरील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, चिंचवड स्टेशन दवाखाना, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, बालवाडी पुनावळे दवाखाना जवळ पुनावळे,

जुने तालेरा रुग्णालय (सकाळी नऊ ते रात्री आठ), जिल्हा परिषद शाळा ताथवडे, मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट क्लीनिक वाल्हेकरवाडी, हनुमंतराव भोसले दवाखाना क्रांती चौक नेहरूनगर, क्वालिटी सर्कल भोसरी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी, महापालिका कन्याशाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, बाबाजी पांडू भांडे पिंपळे निलख दवाखाना, महापालिका शाळा वाकड, महापालिका क्रीडा संकुल कावेरी नगर, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, माजी सैनिक भवन दत्तनगर दिघी, पंडित जवाहरलाल नेहरू शाळा च-होली, सखुबाई गवळी गार्डन भोसरी, महापालिका बहुउद्देशीय तालीम इमारत बोपखेल, नवीन भोसरी रुग्णालय, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी (सकाळी नऊ ते रात्री आठ), स्केटिंग ग्राउंड सेक्टर 21 यमुनानगर, तळवडे समाजमंदिर शाळा, प्राथमिक शाळा 92 मोरे वस्ती म्हेत्रे वस्ती, घरकुल दवाखाना चिखली,

ठाकरे शाळा रुपीनगर, विवेकानंद बॅडमिंटन हॉल यमुनानगर, भानसे स्कूल यमुनानगर, नूतन शाळा ताम्हाणेवस्ती, यमुनानगर रूग्णालय सकाळी नऊ ते रात्री आठ, नवीन थेरगाव रुग्णालय (सकाळी नऊ ते रात्री आठ), कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, महापालिका शाळा रहाटणी, जुने जिजामाता रुग्णालय (सकाळी नऊ ते रात्री आठ), दीनदयाल शाळा संत तुकाराम नगर पिंपरी (सकाळी नऊ ते रात्री आठ), अहिल्यादेवी होळकर सांगवी महापालिका शाळा, दापोडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा वेताळ महाराज सोसायटी जुनी सांगवी, निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव (सकाळी 9 ते रात्री 8), वायसीएम रुग्णालय ओपीडी गेट नंबर एक (दुपारी दोन ते रात्री 8) या 52 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 वर्षांवरील नागरिकांना या ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, वायसीएम रुग्णालय ओपीडी गेट नंबर एक (दुपारी दोन ते रात्री 8), जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या 8 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, वायसीएम रुग्णालय ओपीडी गेट नंबर एक (दुपारी दोन ते रात्री 8), अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button