breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तांत्रिक कारणामुळे लसीकरण केंद्र दोन दिवसांपासून बंद

  • साठा उपलब्ध असूनही मनमाडकरांची निराशा

मनमाड |

इतके दिवस लस उपलब्ध नाही म्हणून शहरातील करोना प्रतिबंधक लसीकरण विस्कळीत झाले होते. आता भरपूर लस उपलब्ध असतांनाही केवळ तांत्रिक कारणामुळे दोन दिवसांपासून शहराचे लसीकरण बंद असल्याचा अजब प्रकार उघड झाला आहे. तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असतांना  मनमाडला उपजिल्हा रुग्णालयात करोना चाचणीसाठी स्त्राव नमुने घेण्याचेही बंद झाले आहे. दुसरीकडे करोना केंद्र आणि करोना काळजी केंद्र कर्मचाऱ्यांअभावी बंद पडले आहे. त्यामुळे सध्या रुग्णांवर उपचार तसेच संशयितांचे नमुने घेण्याचे बंद असून त्यावर लसीकरणही बंद झाल्याने  मनमाडकर तिहेरी अडचणीत सापडले आहेत. अशा नाजूक परिस्थितीतच शहर परिसरात काही दिवसांत करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये करोना संशयित तसेच डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हिवतापसदृश रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे.

शासकीय आरोग्य विभागातील तसेच उपजिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लसीकरण करणे, नमुने घेणे तर सकारात्मक रुग्णांसाठी असलेले शासकीय करोना केंद्र आणि प्राणवायू केंद्रही सध्या कर्मचारी  नसल्याने बंद आहेत. दुसरीकडे मनमाड  शहरात एकाही खासगी रुग्णालयात करोना रुग्णांवर अधिकृतपणे उपचाराची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पुन्हा एकदा करोनाच्या संभाव्य संकटाची  मनमाडकरांवर टांगती तलवार आहे.महिन्याभरात श्रावणातील सण, उत्सव तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झालेली गर्दी, सामाजिक अंतराचा अभाव, विनामुखपट्टीने शहरात वावरणाऱ्यांची मोठी संख्या, त्यावर पालिकेचे झालेले दुर्लक्ष या सर्वाचा एकत्रित परिपाक म्हणजे रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. करोना संशयित रुग्ण नमुना देण्यासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात गेले असता तेथे टाळाटाळ केली जाते. नमुने घेतले जात नाहीत, अशा रुग्णांच्या तक्रारी आहेत. ऑगस्ट महिनाभर शहरात करोना रुग्णांचे प्रमाण शून्य होते. त्यामुळे  मनमाडकर शहर करोनामुक्त झाल्याच्या शक्यतेने नििश्चत होते. परंतु, नंतर पुन्हा संसर्ग सुरू झाल्याच्या तक्रारी आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाकडून शनिवारी लसीचा भरपूर पुरवठा झाला. सोमवारचे लसीकरण वेळापत्रकही जाहीर झाले. परंतु, ऐनवेळी इंजेक्शनसाठी जीज सुई वापरली जाते ती संपल्यामुळे लसीकरण थांबल्याची माहिती आहे. मनमाडला दुसऱ्या मात्रेसाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नाही. कधी येणार ते सांगितलेही जात नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.

– अजित सुराणा (उद्योजक)

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसींसाठी नांदगाव तालुक्याकडून जेवढी मागणी आली तेवढ्या लसीचा पुरवठा करण्यात आला आहे.

– एस.पी.आहेर (जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button