breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेशा लस साठ्याअभावी उद्या गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मत्र खाजगी रुग्णालयामध्ये लसीकरण सुरुलातपणे चालले पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून पुरेशा प्रमाणात लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणात सातत्याने अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे.

लसीचे डोस नसल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक तास थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिकांची कोंडीही झाली आहे. काहींना दुसऱ्या डोसची मुदत संपून लस मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज रात्री उशिरा पर्यंत लससाठा प्राप्त होणार आहे. त्याचं वितरण उद्या दिवसभरात सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांना करण्यात येणार आहे. महानगरपालिकेला, कोविशिल्डचे 50 हजार तर कोवॅक्सिनचे 11 हजार 200 असे एकूण 61 हजार 200 डोस प्राप्त होणार आहेत. हा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर त्याचे उद्या दिवसभरात वितरण केलं जाईल. त्यामुळे उद्या 22 जुलै 2021 मुंबईत लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पण, शुक्रवारी म्हणजे 23 जुलैला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button