breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या उर्वरीत कर्मचा-यांना कोविड प्रतिबंधक लस द्या – संतोष सौंदणकर

  • प्रादेशिक संचालकांना निवेदन देऊन केली मागणी
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार

पिंपरी / महाईन्यूज

पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या चार हजार कार्यरत अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचा-यांपैकी 40 टक्केच कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत 60 टक्के कर्मचा-यांचे लसीकरण अद्याप बाकी राहिले आहे. लसीकरणास विलंब होत असल्यामुळे कर्मचा-यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे महावितरण कंपनीच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. तरी, उर्वरीत 60 टक्के कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य तथा शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांनी केली आहे.

यासंदर्भात सौंदणकर यांनी महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना देखील महावितरणचे पुणे जिल्ह्यातील अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी वीज देयक वसुलीसाठी बाहेर फिरत असतात. कामावर असताना काही कर्मचा-यांना कोरोनाची बाधा होऊन आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेक कर्मचारी रुग्णालयात उपचार देखील घेत आहेत. महावितरणच्या कर्मचा-यांची फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून नोंद करण्यात आली. मात्र, त्यांचे शंभर टक्के लसीकरण अद्यापही झालेले नाही. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना कर्मचा-यांना संसर्ग होण्याची भिती बळावत चालली आहे, असेही सौंदणकर यांनी म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यात महावितरणचे 4 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 40 टक्के कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण जाले. उर्वरीत 60 टक्के कर्मचा-यांचे लसीकरण अद्यापही प्रतिक्षेत आहे. या दिरंगाईमुळे कर्मचा-यांनी कंपनीच्या विरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे कंपनीच्या नावाला धब्बा लागत आहे. तरी, उर्वरीत अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्गाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून मान्यता घ्यावी. लसीकरण न झालेल्या कर्मचा-यांची यादी त्यांना पाठवून द्यावी. मी सुध्दा नावाची यादी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हाधिकारी यांना तसे आदेश देण्यासाठी प्रयत्न करेन, असे सौंदणकर यांनी सांगितले.

संपूर्ण जिल्ह्यातील एक अथवा दोन विभाग एकत्र करून कार्यालयात लसीकरण केंद्र तयार करावीत. लसीकरणाचे नियोजन करून त्यांच्या कुटुंबियांना लस देण्यात यावी. त्यामुळे कर्मचारी आणि त्याचे कुटुंब कोविड महामारीत सुरक्षित राहिल. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल, अशी मागणी सौंदणकर यांनी निवेदनाद्वारे सौंदणकर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button