breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांची जयशंकर यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली |

अफगाणिस्तानातील अस्थिर परिस्थितीबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताचे समपदस्थ एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. ब्लिंकन यांनी जयशंकर यांना दूरध्वनी केला. त्यात अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. तालिबानने त्या देशात सत्ता काबीज केल्यानंतर भारताने सोमवारी असे म्हटले होते की, शीख व हिंदू समाजाच्या लोकांना अफगाणिस्तानातून माघारी आणण्यासाठी मोहिमा राबवल्या जातील तसेच अफगाणिस्तानातील हवाई क्षेत्र हे अनियंत्रित असल्याने व्यावसायिक विमान वाहतूक थांबवण्यात आली आहे.

जयशंकर हे सोमवारी न्यूयॉर्कमध्ये आले असून भारत सध्या सुरक्षा मंडळाचा अध्यक्ष असल्याने दोन उच्चस्तरीय कार्यक्रमांसाठी ते उपस्थित राहणार आहेत. ब्लिंकन यांनी त्यांच्याशी अफगाणिस्तानवर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिली. त्यानंतर जयशंकर यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यात काबूलमधील विमानतळ सेवा सुरळीत करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला. काबूलमधील भारतीय दूतावास कर्मचाऱ्यांना मायदेशी आणण्याबाबतही चर्चा झाली. संयुक्त राष्ट्रातील विविध कार्यक्रमांत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा केली जाईल, असे जयशंकर यांनी सूचित केले. काबूलमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगून ते म्हणाले की, जे लोक भारतात परतण्यासाठी आतुर आहेत त्यांची स्थिती आपण समजू शकतो, त्याबाबत चर्चा सुरू आहे. काबूलमधील हिंदू व शीख समुदायाच्या नेत्यांशी सतत संपर्कात असून त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न केले जातील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button