TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमनोरंजन

उर्फी जावेद पुन्हा झाली ट्रोल, पण कपड्यांसाठी नव्हे तर….

उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी रोज वेगवेगळ्या लुकमध्ये दिसते. गेले काही दिवस अभिनेत्री उर्फी जावेद आणि अभिनेत्री चाहत खन्ना यांच्यातील वाद म्हणजे चर्चेचा विषय बनला आहे. या दोघीजणी गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर स्पष्ट शब्दात टीका करताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी सभ्यतेची पातळी ओलांडली आहे. उर्फी कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अनेकदा उर्फी तिच्या अनोख्या कपड्यांच्या फॅशनमुळे ट्रोलिंगची शिकारही होते. पण यावेळी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर उर्फी जावेदचे कपडे नसून त्याची लिपस्टिक आली आहे. मंगळवारी उर्फी पुन्हा एकदा पापाराझीसमोर दिसली आणि तिथे उभे असलेले सर्वजण तिला पाहून आश्चर्यचकित झाले. पांढऱ्या रंगाच्या या ड्रेससोबत उर्फीने निळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. तिने या अवतारातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. नेटकऱ्यांनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोल केले आहे.

तिच्या व्हिडिओंवर नेटकरी सतत कमेंट करून तिला फॅशन सेन्स शिकवत आहेत. उर्फीच्या या व्हिडिओवर एका यूजरने लिहिले, ‘मॅडम तुम्ही चुकून पेनातली शाई प्यायली आहे का?’ दुसऱ्याने लिहिले, ‘कोणीतरी विष प्यायले आहे असे दिसते.’ यासोबतच दुसऱ्याने कमेंट केली, ‘लिपस्टिक. त्याऐवजी तुम्ही शाई लावली का? असे प्रश्न त्यांनी केले.

मध्यंतरी उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिला ब्लॅकमेल करुन त्रास देणाऱ्या व्यक्तीबद्दलची माहिती दिली होती. उर्फी जावेदच्या या पोस्टनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होत. उर्फी कायमच आपली मतं ठामपणे मांडत असते. तसेच वेळोवेळी ट्रोलर्सनादेखील सडेतोड उत्तर देत असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button