नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण!
मुंबई |
राज्यातला करोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र दिसत आहे. राज्यातल्या करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. सुप्रिया सुळे, एकनाथ शिंदे, यशोमती ठाकूर यांच्यासह राज्यातल्या अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही आता करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी.”
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2022
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनाही करोनाची लागण झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यांनीही ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे आणि आपण विलगीकरणात असल्याचं सांगितलं आहे.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!
— Arvind Sawant (@AGSawant) January 4, 2022
आपल्या ट्वीटमध्ये सावंत म्हणतात, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!