ताज्या घडामोडीपुणे

निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे अवेळी पाऊस – पंजाबराव डख

न्हावरे | मागील काही वर्षांपासून जंगलतोड होऊन त्याजागी प्रदुषीत कंपन्या त्याचबरोबर सिमेंटची जंगले उभी राहिली एकुणच निसर्गाचा ऱ्हास होऊन समतोल बिघडल्यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढुन निसर्ग आता त्याचे रुद्ररूप दाखवू लागला आहे. त्यामुळे अवेळी पाऊस व हवेतील वातावरण सातत्याने बदलत असल्याचे मत प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. (Panjabrao Dakh)

शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे सुनंदा ऍग्रो एजन्सीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरूवर्य संभाजी(तात्या) पवार होते. श्री डख पुढे बोलताना म्हणाले की निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे पाऊस होतोय पण अलिकडच्या काळात ढगफुटी सारख्या (पावसाचे) प्रमाण वाढले आहे त्यामध्ये सुसुत्रता आणायची असेल तर वृक्षारोपन करून झाडांची संख्या वाढवणे गरजेचं आहे.

यावेळी डख पाटील यांनी शेतकऱ्यांना हवामानाबद्दल अचूक सल्ले आणि काही ठोकताळे सांगितले यावेळी शिवकुमार देशमाने, ज्ञानेश्वर ढवले, शामराव पवार, दादा पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिरूर बाजार समितीचे संचालक सतिश कोळपे, न्हावरे तंटामुक्ती चे अध्यक्ष दिनेश दरेकर, बापुसाहेब काळे, राजहंस काळे, जयराम भगत,उपस्थित होते. प्रास्ताविक विकास पवार सूत्रसंचालन अनिल पवार आभार वैभव पवार यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button