breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पाॅझिटीव्ह
मुंबई |
राज्यातील व देशातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे आणि या यादीमध्ये आणखी एका बड्या नेत्याचे नाव आले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत.
सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत:ला सर्व अटींची पूर्तता करत होम क्वॉरंटाईन केलं आहे व त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्व मंडळींना, कार्यकर्त्यांना स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी असेही आवाहन केले आहे. त्यांनी स्वत:बद्दल सांगताना म्हटले की, कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे कळताच त्यांनी स्वत:ला विलग केले. सर्वांनी योग्यती काळजी घ्या व नियमांचे काटेकोरपणे पालन करा असेही सांगितले.