Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे खासगी वायरमन म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे खासगी वायरमन म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अशोक ठोके असे या तरुणाचे नाव असून अशोक हा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावातील छोटे-मोठे विद्युत जोडणीचे काम करून आपला संसार प्रपंच चालवत होता. परंतु एका शेतकऱ्याच्या शेतात विजेच्या पोलवर चढून काम करत असताना अशोक हे अचानक खाली कोसळले. त्यांना मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु अखेर प्रकृती खालावल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घडलेल्या या घटनेमुळे गावावर सुखकळा पसरली असून दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अशोक हे त्यांचा संसार हा अर्धवट सोडून गेले. त्यांना एक सहा महिन्याचा मुलगा देखील आहे. अशोक यांच्या परिवारात आई, एक मोठा भाऊ, पत्नी आणि सहा महिन्याचे बाळ असा परिवार असून या परिवाराकडे एक ते दोन एकर शेती असल्याची माहिती देखील गावकऱ्यांनी दिली आहे. या संदर्भात अद्याप तरीही कुठल्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाहीये. अशोक यांचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या झटक्याने झाला की पोलवरून खाली पडल्यामुळे झाला हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

विद्युत जोडणी करत असताना आतापर्यंत अनेक कर्मचारी व खाजगी कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे असं काम करत असताना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सलग पाऊस सुरू असल्यामुळे भागातील विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे कोसळलेले विद्युत पूल उभारणी करण्याचे काम देखील सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जमिनीत ओलावा असल्यामुळे विद्युत प्रवाह जमिनीत उतरण्याचे प्रमाण जास्त असते. अशावेळी आपल्या गुरांची जनावरांची आणि शेतकऱ्यांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button