breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ‘पीएमआरडीए’च्या विकासाला गती मिळणार – विलास लांडे

पिंपरी / महाईन्यूज

49 वर्षांच्या कालखंडानंतर प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलीन होणार आहे. 842 गावांना विकासाची दिशा देणाऱ्या पीएमआरडीएकडे पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी आली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या दुरदृष्टीच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहराचा ज्या पटीने विकास झाला तेवढ्याच पटीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या दोन शहरासह पुणे जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार आहे, असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.

माजी आमदार लांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे आता पीएमआरडीए मध्ये विलीन होणार आहे. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मौजे मोशी येथे सेक्टर नं ५ व ८ मधील सुमारे ९८ हेक्टर जागेमध्ये ‘आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र’ स्वत: उभारणी करण्याचा निर्णय काही वर्षापुर्वी घेतला.पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात तसेच तळेगाव, चाकण, रांजणगाव या भागांमध्ये वाढते औद्योगिकरण यामुळे या ठिकाणी औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. मोठी गंतवणूक शहरात येऊ शकते. लोकनेते शरद पवार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प निर्माण होणार होता. स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या आराखडयास मंजूरी दिली त्यानुसार हे प्रकल्प होणे गरजेचे आहे. मात्र सत्ता बदल झाल्यानंतर तत्कालीन भाजप सरकार व महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी याला खो घातला. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागलेला नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींकरिता सहा विभागीय स्तरावर उच्चस्तर आद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणेबाबत शासन निर्णय क्रमांक ईबीसी २००५ / प्रक २९५ / मावस २ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई दिनांक ०९ जानेवारी २००६ या शासन निर्णयानुसार पुणे विभागीय स्तरावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणेसाठी परवानगी मिळालेली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील पेठ निहाय अंतर्गत रस्ते तयार करणे. पेठ क्र. ३, ४, ९, १० ते २१ मध्ये उद्यान/ बगीचे विकसीत करणे.  पेठ क्र. ४, ९, १० ते १९ मध्ये खेळाचे मैदाने विकसीत करणे. ६. पेठ क्र. ४, ७, १८, १९ ते २१ मध्ये हॉकर्स झोन विकसीत करणे. पेठ ७, १८, २० व चिखली मध्यवर्ती सुविधा केंद्र मध्ये वाहनतळ विकसीत करणे. मोक्याच्या जागी स्वच्छतागृह विकसीत करणे. चिखली मध्यवर्ती सुविधा केंद्र मध्ये कल्बची जागा विकसीत करणे.  पेठ क्र. ७ व १० मधील फॅसिलिटी सेंटरर्स मध्ये आय. टी. आय. व रात्रशाळा/ कॉलेज तसेच उद्योजकाना उपयोगी होतील अशा सुविधासह विकसीत करणे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्राधिकरण बाजार उभारणे आदींचा पाठपुरावा केला आहे. तसेच निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपुलाचा आराखडा राष्ट्रवादीच्या कार्यकाळात तयार करण्यात आला. आघाडी सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मौजे मोशी येथील पेठ क. १४ मधील ६.५७ हेक्टर (सुमारे १५ एकर क्षेत्र न्याय संकुलासाठी वाटप करण्याची पुणे जिल्हा न्यायालय पुणे यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने सदर जागा जिल्हा न्याय संकुल व न्यायिक अधिका-यांच्या निवासस्थानासाठी उपलब्ध करून देण्याबाबत विधी व न्याय विभागाने नगरविकास विभाग महाराष्ट्रशासन यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावातील मागणीबाबत संदर्भाधीन पत्रान्वये उपरोक्त जागा प्राधिकरणाच्या भुवाटप नियम १९७३ च्या भाग ३ नियम ५ नुसार पुणे जिल्हा न्यायालय पुणे यांना जिल्हा न्याय संकुल आणी न्यायक अधिका-यांच्या निवाससस्थानासाठी शासन निर्णय क पीसीएन-३०१० / ११६३ / प्र.क. ३७२ /२०१०/नवि-२२, मंत्रालय मुंबई. दि. १५ सप्टे २०१० रोजीच्या आदेशाने जागेचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु सदर जागेच्या अधिमुल्याची विधी व न्याय विभागाकडून प्राधिकरणास भरण्यात आलेली नाही. तरी नवीन जिल्हा न्याय संकुल व न्यायिक अधिका-यांच्या निवासस्थानासाठी प्राधिकरणातील पेठ क.१४ मध्ये वाटप झालेल्या जागेचे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्याकडे अधिमुल्य रक्कम भरणे कामी सहकार्य करावे अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

पेठ क्रमांक 2 मध्ये भाजी मंडई, ग्रंथालय, संगीत विद्यालय, पेठ क्रंमांक 3 मध्ये महिला वसतिगृह, पेठ क्रमांक 4 मध्ये अपंगाचे पुनर्वसन शैक्षणिक केंद्र. (मतिमंद, कर्णबधिर मूक बधिर), पेठ क्रमांक ९ बहुउद्देशीय हॉल, पेठ क्रमांक 10 मध्ये मटन मार्केट, फिश मार्केट व अनुषंगिक सुविधा,पेठ क्रमांक 11 मध्ये सर्व चिकित्सालय व वृद्धाश्रम, पेठ क्र 18 वीरपत्नी श्रीमती बारकूल यांना गॅस एजन्सी व गोडाऊन, पेठ क्रमांक 18 व्यायामशाळा, मुला मुलींचे वस्तीगृह व ग्रंथालय, बालसंगोपन केंद्र, पेठ क्रं 20 अंपग मुलींसाठी स्वावलंबन केंद्र व निराधार महिला केंद्र, चिखली डिस्ट्रिक्ट सेंटर येथे मुलांचे वसतीगृह, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, पोलीस चौकी या कामाचा समावेश करण्याचा निर्णय 26 सप्टेंबर 2013 रोजीच्या प्राधिकरण बैठकीत घेण्यात आला. प्राधिकरणातील १५००० अनधिकृत बांधकाम व वाढीव बांधकाम यांना नाममात्र दर आकारून नियमीत करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. तसेच, भोसरी येथील पोलीस स्टेशनला जागा मंजूर करून पोलीस आयुक्त यांना अधिमूल्य भरण्याबाबत कळविले आहे. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचा विकास आराखडा सुधारीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला व त्यासाठी रुपये ९७.१० लक्ष एवढी रक्कम माननीय संचालक यांचेकडे वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी मुळे प्राधिकरणाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड चा विकास झाला. प्राधिकरण हे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये विलीनीकरण झाले असले तरी अजित दादा च्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार आहे. ज्या प्रक्रारे अजित दादा नी पिंपरी चिंचवड शहरातले प्रलंबित विकास प्रकल्प  मार्गी लावले, त्याच प्रकारे पुणे क्षेत्र विकास प्राधिकरण च्या माध्यमातून जिल्ह्यातील रखडलेले व नवीन प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वास लांडे यांनी विकत केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button