ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

अभिनेत्री कंगना राणावत सध्या तूफान चर्चेत

कानाखाली मारणाऱ्या CISF महिलेला बॉलिवूडकडून मोठी ऑफर

मुंबई : कंगना राणावत हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. हेच नाही तर लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. नुकताच कंगना राणावत ही लोकसभा निवडणूक जिंकली आहे. कंगनाने मंडीमधून निवडणूक लढवली. कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर धक्कादायक घटना घडली. ज्याचे काही व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या प्रकरणानंतर कंगना राणावत हिच्याकडून तक्रार देखील दाखल करण्यात आली.

चंदीगड विमानतळावर CISF च्या कर्मचारी महिलेने थेट कंगना राणावत हिच्या कानाखाली मारली. या महिलेचे नाव कुलविंदर कौर आहे. या घटनेनंतर कुलविंदर कौरला ताब्यात घेऊन तिला निलंबित देखील करण्यात आले. आता कुलविंदर कौर ही सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी कुलविंदर कौर नेमकी कोण? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कंगना राणावत हिच्या कानाखाली मारण्यात आल्यानंतर बॉलिवूडच्या कलाकारांकडून काहीच भाष्य त्यावर केले आहे. आता डान्सर विशाल ददलानीने एक पोस्ट शेअर केलीये. विशाल ददलानीची पोस्ट पाहून विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांना विशाल ददलानीची पोस्ट पाहून धक्काच बसलाय. विशाल ददलानीने थेट त्या सीआयएसएफ महिलेचे काैतुक केले आहे.

यासोबत विशाल ददलानीने कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधला आहे. आता कंगना राणावत हिच्या कानाखाली मारणाऱ्या महिलेला विशाल ददलानी नोकरी देणार आहे. विशाल ददलानीने सोशल मीडियावर कंगना राणावत हिला कानाखाली मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही पोस्ट आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

विशाल ददलानीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही पण सीआयएसएफ जवान महिलेचा राग मी पूर्णपणे समजू शकतो. त्या महिलेवर कारवाई झाली तर मी तिला नोकरी देईन, जर तिला ते मान्य असेल तर. जय हिंद, जय जवान आणि जय किसान. असे विशाल ददलानी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. ही पोस्ट आता चर्चेचा विषय ठरलीये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button