साडी बदलत असताना शेजाऱ्याने पाहिलं…, पुण्यात अल्पवयीन मुलीसोबत केलं भयंकर कृत्य

पुणे : पुण्यातील गुन्हेगारी काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. खून, दरोडे, बलात्काराच्या घटना पुण्यात रोजच घडायला लागल्या आहेत. अशातच पुण्यातील गुलटेकडी भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर शेजारच्याच एका तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी म्हणजेच शिवजयंतीला पीडित मुलगी शाळेत साडी नेसून गेली होती. शाळेतून घरी येऊन ती साडी बदलत असताना तिच्या शेजारी राहणारा तरुण घरात शिरला आणि तिच्यावर अत्याचार केला. या नराधमाने पुढे अनेकवेळा या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. पोलीस उपनिरीक्षक साबळे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, अल्पवयीन मुलीला फूस लावून मुंबईला पळवून नेले होते. पोलिसांनी तिला परत घरी आणल्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी २५ वर्षाच्या एका तरुणाला अटक केली आहे.