वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने पक्ष कार्यालयासमोर निषेध आंदोलन
देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य गुन्हेन्वेषण विभागाकडून आरोपपत्र दाखल

नाशिक : मस्साजोगचे (जि.बीड) सरपंच संतोष देखमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याला फाशीची शिक्षा देण्यासाठी व समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात शिवसेनेच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य गुन्हेन्वेषण विभागाकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले.
आरोपपत्रात व्हिडीओ किल्प व फोटो दाखल करण्यात असून अनेक माध्यमांच्या माध्यमातून ते फोटो महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. महाराष्ट्रात एखाद्या खंडणी मागण्यासाठी व दहशत निर्माण करण्यासाठी एका सरपंचाची अशा पद्धतीने हत्या होणार असेल तर अशा सर्व आरोपींना ताबडतोब फाशी झालीच पाहिजे.
हेही वाचा : राज्य सरकारचा मोठा निर्णय! प्रतिज्ञापत्राची ५०० रुपयांची स्टॅम ड्युटी माफ
महाराष्ट्रातील कायदा सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी व अशा विकृतींचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे व प्रमुख आरोपी वाल्मीक कराडसह त्यांच्या सर्व साथीदारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत शिवसेनेच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी औरंगजेब बद्दल कौतुकास्पद उदगार काढल्याने आझमी यांचा निषेध करण्यात आला.
शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, श्यामकुमार साबळे, शिवाजी भोर, दिगंबर मोगरे, प्रमोद लासुरे, अमोलसूर्यवंशी, विधानसभा प्रमुख रोशन शिंदें, जिवन दिघोळे, महिला आघाडी ग्रामीण जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, मंदाकिनी जाधव, ज्योती फड, सुनीता जाधव आदी उपस्थित होते.